महसूल खात्याचा ऑनलाईन सातबारा ऑफलाईन झाल्याने शेतकरी मेटाकुटीला

हुकूम मुलाणी
मंगळवार, 10 जुलै 2018

मंगळवेढा : महसूल खात्याचा ऑनलाईन सातबारा ऑफलाईन झाल्याने हवामानावर आधारित पिकाचा विमा भरण्यासाठी कागदपत्रे गोळा करून शेतकरी पुरता मेटाकुटीला आला. त्यात राष्ट्रीयकृती बॅकाकडूनही बिगरमराठी कर्जदार शेतकऱ्याला परत पाठवले जात असल्याने शेतकऱ्यांची अवस्था भीक नको पण कुत्रा आवर असे म्हणण्याची वेळ आली.

मंगळवेढा : महसूल खात्याचा ऑनलाईन सातबारा ऑफलाईन झाल्याने हवामानावर आधारित पिकाचा विमा भरण्यासाठी कागदपत्रे गोळा करून शेतकरी पुरता मेटाकुटीला आला. त्यात राष्ट्रीयकृती बॅकाकडूनही बिगरमराठी कर्जदार शेतकऱ्याला परत पाठवले जात असल्याने शेतकऱ्यांची अवस्था भीक नको पण कुत्रा आवर असे म्हणण्याची वेळ आली.

गतवर्षी हवामानावर आधारीत फळ पिक विम्याचा पाच कोटीपेक्षा अधिक रकमेचा लाभ तालुक्यातील शेतकऱ्याला मिळल्याने शेतकरी कसा बसा तरला गेला. त्यामुळे यंदाचा डाळीब पिकाचा विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांची लवकरच पळापळ सुरू झाली.  सध्या पिक विमा ऑनलाइन नोंदणी केल्याशिवाय भरपाई मिळणार नसल्याचे जाहीर केले. ऑनलाईन सातबारा ऑफलाईन झाल्याने हेच उतारे व दाखले मिळवण्यासाठी सिमावर्ती भागातून येवून मागेल तेवढे पैसे देवून तलाठयाच्या दारात वाट पहात बसावे लागत आहे. ऑनलाईन नोंदणीमुळे दुबार लाभ घेण्याचा प्रयत्न करणारे यंदा मात्र वंचित राहणार आहेत.

यंदाचा प्रधानमंत्री फळ पीक विमा योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत 14 जुलै असल्यामुळे वेळेत सहभागी होण्यासाठी शेतकरी पळापळ करु लागले असून यापासून वंचीत राहू नये म्हणून पळापळ करून गोळा केलेली कागदपत्रे बॅकेत नेल्यावर बॅकेकडूनही नकार ऐकावा लागल्याने शेतकरी त्रस्त झाला. गतवर्षी ऑफलाईन घेतलेला विमा प्रस्ताव ऑनलाइन करताना कमी मुदतीमुळे बॅक अधिकारीही चांगलाच धास्तावला गेला. बॅंकेतील रिक्त पदे यामुळे अतिरिक्त कारभार दैनंदिन कामकाज करून मेटाकुटीला आलेल्या कर्मचाय्राला विमा प्रस्ताव म्हणजे डोकेदुःखी ठरू लागली. त्यामुळे बॅकानी कर्जदार शेतकऱ्यांचे प्रस्ताव स्विकारणार असल्याचे सांगितल्यावर बिगर कर्जदार शेतकरी त्रस्त झाला सीएससी सेंटर व महा-ई-सेवा केंद्रातील विमा कंपनीचा सर्वर संथगतीने चालू लागल्याने त्यांना बाकीचेही काम करता येत नाही.
 

Web Title: saatbara of Revenue Department was made offline, due to that the farmer are in stressed