#SaathChal माऊलींच्या पादुकांना नीरा स्नान; पावसाच्या हजेरीने वारकाऱ्यांमध्ये उत्साह

#SaathChal enthusiasm in warkari because of rain
#SaathChal enthusiasm in warkari because of rain

वडगाव निंबाळकर - संत ज्ञानेश्र्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील महत्वपुर्ण समजला जाणारा नीरा स्नान सोहळा मोठ्या उत्सहात आज दुपारी दोनच्या सुमारास पार पडला. पादुका नदी काठावर आनल्यावर पावसाच्या सरी येऊ लागल्या नीरा नदीच्या पाण्याबरोबर वरून राजा माऊंलीच्या पादुकावर बरसला.. आणि माऊली...माऊली..माऊली असा एकच आवाजाच्या गजराने नदी काठ दुमदुमुन गेला. मोठ्या भक्तीमय वातावरणात लाखो वारकरऱ्यांच्या जयघोषात नीरा स्नान सोहळा पार पडला.

नीरा भिवरी पडता दृष्टी, स्नान करिता सुद्ध सृष्टी।
अंती तो वैकुंठ प्राप्ती, ऐसे परमेष्टी बोलिला।

अशा आभंगाच्या ओवी आळवीत वारकऱ्यांनी नीरा स्नान घातले. पुणे जिल्ह्यातील सात दिवसांच्या प्रवासा नंतर माऊलींची पालखीने आज शु्क्रवार ता. १३ सातारा जिल्ह्यात प्रवेश केला. महर्षी वाल्मीकींच्या वाल्हे गावातील मुक्मामानंतर पालखीने सकाळी नीरा नदीच्या दिशेने प्रस्थान ठेवले. सकाळी न्याहरीसाठी सोहळा पिंपरे खुर्द येथे विसावला होता. नीरा नगरीत मोठ्या भक्तीभावाने पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. येथील सरपंच दिव्या पवार, उपसरपंच बाळासाहेब भोसले, जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती दत्ताजी चव्हाण, पुरंदरच्या माजी सभापती सुजाता दगडे, राजेश काकडे, अणिल चव्हाण, राजेश चव्हाण, पोलीस पाटील राजेंद्र भासकर, कल्याण जेधे यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थीत होते. नीरा नदीकाठावरील घाटावर पालखी दर्शनासाठी ठेवण्यात आली होती. गावात घरोघरी वारकऱ्यांच्या टाळ मृदंगाचा आवाजात अभंगाचे गायन सुरू होते. किर्तन भजनाने नीरा काठ भक्तीमय झाला होता. तीन तासांच्या विश्रांतीनंतर पालखी नदी पात्रात आली.

स्नान सोहळ्यानंतर पुणे जिल्ह्यातील पदाधीकाऱ्यांनी पालखीला निरोप दिली. सातारा जिल्ह्यातील प्रवेशाची मोठी तयारी ठेवली होती. फटाक्यांची आताषबाजीने स्वागत झाले. आमदार मकरंद पाटील, जिल्हाधीकारी श्वेता सिंघल, जिल्हा पोलीस अधिक्षक संदिप पाटील, सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे निंबाळकर, फलटणचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. अनिल पाटील, खंडाळा तालुक्याचे तहसीलदार विवेक जाधव उपस्थित होते.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com