संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाची हद्द राहणार ४५ मीटर

राजकुमार थोरात
मंगळवार, 3 जुलै 2018

अनेक नागरिकांनी झाडांची भरपाई मिळावी म्हणून नव्याने झाडांची लागवड केली आहे. मात्र चार-पाच वर्षापूर्वीच्या जुन्या झाडांचा मोबदला मिळणार आहे. नागरिकांनी नवीन लागवड केलेली झाडांचे योग्यरित्या काढून हद्दीच्या बाहेर लावण्याचे आवाहन प्रांतधिकारी हेमंत निकम यांनी केले.
 

वालचंदनगर - संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाची हद्द 45  मीटर राहणार असून सध्याचा अस्तिवात असलेल्या रस्त्यांची रुंदी सोडून उर्वर्रित जमीनीचा मोबादला संबधित नागरिकांना मिळणार असल्याची माहिती प्रांतधिकारी हेमंत निकम यांनी दिली.

इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम  भागातील नागरिकांनी भूसंपादनासंदर्भात हरकती घेतल्या होत्या. त्याची सुनावणी आज मंगळवार (ता. ३)  रोजी जंक्शन  व भरणेवाडी  येथे सुनावन्या घेण्यात आल्या. यावेळी निकम यांनी सांगितले की, पालखी महामार्गाच्या मध्यापासुन दोन्हीकडे 22.5 मीटर हद्द राहणार आहे. तांत्रिक अडचणी तपासणी रस्ताचे वळण काढण्यात येईल. तसेच सध्याच्या राज्यमहामार्गाची हद्द 20 ते 30 मीटर अाहे. संबधित नागरिकांना मोबदला देताना ही हद्द वगळण्यात येणार आहे. तसेच भरपाई देताना बागायती शेती, जिरायत शेती, बिगरशेती जमीन अशा तीन प्रकारचे वर्गीकरण करण्यात येणार आहे.

रेडीरेकनर पेक्षा चार ते साडेचार पट जास्त दर देण्यात येणार आहे. सातबारा नावावरती असणाऱ्या व्यक्तीला भरपाई देण्यात येईल. शासकीय जागेमध्ये अतिक्रमण करुन बांधकाम केलेल्या नागरिकांना बांधकामाचे मुल्यांकन करुन नुकसानभरपाई देण्यात येईल. येथुन पुढे नव्याने बांधकाम करणाऱ्या नागरिकांना भरपाई मिळणार नाही. तसेच ज्या नागरिकांनी बिगरशेती जमीन केली आहे.मात्र त्यांच्या सातबाऱ्यावरती शेतीची नाेंद आहे, त्यांनी महसूल विभागाकडून रेकॉर्ड ऑर्डर घेवून उताऱ्यावरती बिगर शेतीचची नोंद करावी. त्यांना बिगरशेतीच्या दराप्रमाणे नुकसान भरपाई मिळेल. दुसऱ्या टप्यातील भूसंपादनाचे राजपत्र लवकरच प्रसिद्ध होणार असून सध्या ज्या नागरिकांच्या जमीनीची मोजणी झाली आहे, मात्र नोटीस आल्या नाहीत अशांची नावे दुसऱ्या टप्यात प्रसिध्द होणार असल्याचे सांगितले. यावेळी नॅशनल हायवे अॅथोरटीचे समन्वयक व  डिटेल प्रोजेक्ट रिपोर्टचे प्रमुख चेतन गावडे, नॅशनल हायवे अॅथोरटचे इंजिनिअर कोळेकर,  तलाठी मिलिंद हगारे, ग्रामसेवक युवराज गावडे, कृषी साहय्यक अे.बी धेंडे, भरणेवाडीचे सरपंच गुलाब म्हस्के, विशाल साबळे उपस्थित होते. 

अनेक नागरिकांनी झाडांची भरपाई मिळावी म्हणून नव्याने झाडांची लागवड केली आहे. मात्र चार-पाच वर्षापूर्वीच्या जुन्या झाडांचा मोबदला मिळणार आहे. नागरिकांनी नवीन लागवड केलेली झाडांचे योग्यरित्या काढून हद्दीच्या बाहेर लावण्याचे आवाहन प्रांतधिकारी हेमंत निकम यांनी केले.
 

Web Title: #SaathChal Sant Tukaram Maharaj palkhi will be on the road limit is 45 meters