#SaathChal पालखीतील वारकऱ्यांसाठी आरोग्यसेवा सज्ज

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 जुलै 2018

लोणंद - श्री संत ज्ञानेश्वर माउली पालखी सोहळ्यातील वारकरी व भाविकांच्या आरोग्य सेवेसाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवानराव पवार, खंडाळा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जय्यत तयारी करण्यात आली आहे, अशी माहिती लोणंद प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत बागडे यांनी दिली.

लोणंद - श्री संत ज्ञानेश्वर माउली पालखी सोहळ्यातील वारकरी व भाविकांच्या आरोग्य सेवेसाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवानराव पवार, खंडाळा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जय्यत तयारी करण्यात आली आहे, अशी माहिती लोणंद प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत बागडे यांनी दिली.

पालखी सोहळा येथे शुक्रवारी (ता. १३) दीड दिवसाच्या मुक्कामासाठी येत आहे. सोहळ्यातील वारकरी आणि भाविकांना आरोग्य सेवा पुरवण्यासाठी शासनाच्या आरोग्य विभागाने सर्व ती जय्यत तयारी केली आहे. वारकरी 
व भविकांना शुद्ध व पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा करण्यासाठी पालखी मार्गावरील १९ विहिरींच्या पाण्याचे तसेच टी. सी. एल. चे नमुने सातारा येथील प्रयोगशाळेत तपासण्यात आले आहेत. कालपासून (ता. दहा) पाणी शुद्धीकरणासाठी कर्मचाऱ्यांच्या पाच पथकांची नियुक्ती केलेली आहे.

जलशुध्दीकरणासाठी टी. सी. एल. व मेडिक्‍लोअरचा पुरेशा प्रमाणात 
साठाही उपलब्ध करण्यात आला आहे. पाडेगाव व लोणंद येथे दहा 
ठिकाणी पाण्याचे टॅंकर भरून देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
त्याच्या नियंत्रणासाठी ३४ कर्मचाऱ्यांची नऊ पथके तैनात ठेवली आहेत.

भाविकांना २४ तास आरोग्य सेवा पुरवण्यासाठी चार वैद्यकीय पथकांमध्ये ३३ वैद्यकीय अधिकारी, १३ औषध निर्माण अधिकारी, १७ आरोग्य सहायक, दोन आरोग्य सहायिका, ४२ आरोग्य सेवक, ३० आरोग्य सेविका व ८ शिपाई कर्मचाऱ्यांच्या नेमणुका केल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून सर्व प्रकारच्या औषधांची मागणी करून औषधांचा 
साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून ठेवला आहे. लोणंद प्राथमिक आरोग्य केंद्रातील तपासणी प्रयोगशाळा ३४ तास कार्यान्वित ठेवण्याची व्यवस्था केली आहे. पालखी तळावर एक, लोणंद प्राथमिक आरोग्य केंद्रात एक, माउलींचे नीरा नदी स्नान येथे एक अशा एकूण तीन रुग्णवाहिका उपलब्ध करण्यात आल्या आहेत. आपत्तीकालीन स्थिती उद्‌भवल्यास टोल फ्री क्रमांक - १०८ व १०२ या दूरध्वनी या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही डॉ. बागडे यांनी केले आहे.

वारकऱ्यांच्या सेवेसाठी आरोग्यदूत 
वारकऱ्यांना व भाविकांना तातडीने आरोग्यसेवा मिळावी यासाठी या वर्षी पालखीतळावर आरोग्यदूत वारकऱ्यांच्या सेवेसाठी कार्यरत राहणार आहेत. त्यांना केसरी ड्रेसकोड देण्यात आला असून, प्राथमिक उपचार किट (फस्टेड बॉक्‍स) देण्यात येणार आहे. हे आरोग्यदूत वारकऱ्यांना तातडीची आरोग्य सेवा देण्याबरोबर आरोग्यविषयक जागृतीही करणार असल्याची माहिती डॉ. बागडे यांनी दिली.

Web Title: #SaathChal Wari Palkhi Varkari Health service ready