Video : पिंडदानासाठी पाळलेले कावळे

sachin mane
sachin mane

कोरेगाव - सावडण्याच्या विधीवेळी ‘पिंडा’ला कावळ्याने स्पर्श केला नाही, तर कुटुंबातील व्यक्ती आणि नातेवाइकांच्या मनात रुखरुख राहते. ही रुखरुख राहू नये यासाठी कावळा नाही आला तरी आता काही हरकत नाही. शिरंबेतील (ता. कोरेगाव) सचिन बळीराम माने यांनी चक्क तीन कावळे पाळले असून, मागणीनुसार ते मोफत उपलब्ध करून देत  आहेत.

निधनानंतर सावडण्याच्या विधीवेळी काही वेळा कावळे वाट पाहूनही येत नाहीत. मग गाईला आणून नैवद्य दिला जातो. मात्र कावळ्याने नैवेद्याला स्पर्श केला नाही, याची सर्वांच्याच मनात कायम रुखरुख राहते. नागरिकांची ही रुखरुख दूर करण्यासाठी माने हे आधारवड ठरू लागलेत. आता कोणी कावळ्यांची गरज व्यक्त केलीच तर ते तातडीने तेथे कावळे घेऊन जातात, तेही स्वखर्चाने अन्‌ विना  मोबदला.

कावळे पाळण्याच्या कल्पनेबाबत माने म्हणाले, ‘‘साडेतीन वर्षांपूर्वी शेळ्या चरण्यासाठी शिवारात गेलो होतो. त्या वेळी अचानक वादळी वाऱ्यामुळे डोक्‍यावर कावळ्याचे घरटे पडले. त्यात तीन लहान कावळ्याची पिले होती. ती तडफडत पडलेली असताना त्यांना तेथे टाकून जावेसे वाटत नव्हते. अखेर टॉवेलमधून ती तीन लहान पिल्ले मी घरी आणली आणि त्यांचा सांभाळ सुरू केला. हळहळू ती मोठी झाली अन्‌ माझ्या घरातील सदस्यच झाली. या कावळ्यांना घरात पिंजऱ्यात जखडून ठेवलेले नाही. संपूर्ण घरात त्यांचा मुक्त संचार असतो. घरात तीन कावळे असल्याने माझ्या घरावर इतर किमान दहा ते १५ कावळे दररोज बसून असतात. त्यांनाही जसे जमेल तसे मी खायला देतो.’’ 

मी जीपचालक म्हणून काम करतो. पत्नी स्वाती, मुलगा, मुलगी व तीन कावळे असे माझे कुटुंब आहे. छोटे घर आहे. शेती वगैरे काही नाही. पत्नी शेळ्या सांभाळते. मी माझ्या बायको-मुलांवर जितके प्रेम करतो, तितकेच कावळ्यांवर करतो. 
- सचिन माने,  पक्षिप्रेमी, शिरंबे (ता. कोरेगाव)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com