कोल्हापूरचा सचिन पाटील विजेता 

कोल्हापूरचा सचिन पाटील विजेता 

सांगली - महिन्यापासून जय्यत तयारी झालेल्या पाचवी शहीद मॅरेथॉन आज आंतरराष्ट्रीय निकषानुसार पार पडली. स्पर्धेला राज्यभरातून प्रतिसाद मिळाला. आजचा रविवार सांगलीकरांसह राज्यातील धावपटूंनी एन्जॉय केला. सकाळी सहा वाजता प्रारंभ झाला. केंद्रीय रेल्वेत असणाऱ्या आंतरराष्ट्रीय धावपटू कोल्हापूरच्या सचिन पाटीलने एक तास सहा मिनिटांत तब्बल 21 किलोमीटर अंतर पूर्ण करीत स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. 

शहीद अशोक कामटे स्मृती फौंडेशनतर्फे मॅरेथॉनचे आयोजन केले होते. स्पर्धेत सहभागी पाच हजार धावपटूंनी सांगली ब्रॅंडिंगचा संदेश दिला. विश्रामबागमधील क्रांतिसिंह नाना पाटील चौकात जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे, रुस्तम-ए-हिंद अमोल बुचडे, आंतरराष्ट्रीय मल्ल विनोद गोरे यांची प्रमुख उपस्थिती उद्‌घाटन झाले. ऑलिंपिक धावपटू ललीत बाबर यांचे वडील शिवाजी बाबर यांची विशेष उपस्थिती होती. त्यांनी स्पर्धा संयोजकांचे कौतुक केले. 

21, 10 व 5 किलोमीटर आणि शालेय अशा चार गटांत स्पर्धा झाली. 21 किलोमीटरसाठी शंभरांवर धावपटूंनी भाग घेतला. सचिन पाटील याने विजेतेपद पटकावले. पाठोपाठ येणाऱ्या आदिनाथ भोसले (सातारा) याने द्वितीय क्रमांक पटकावत सांगली स्पर्धा गाजवली. चारही गटातील विजेत्यांना दोन लाखांची पारितोषिके देण्यात आली. ज्येष्ठ नागरिकांचाही उत्स्फूर्त सहभाग होता. 

स्पर्धेत सहभागी स्पर्धकांच्या क्रमांकावर "टायमिंग चीप' बसवली होती. ठिकठिकाणी सेंसर्स असल्याने खेळाडू किती वेळात स्पर्धा पूर्ण करतात, हे ऑनलाइन नोंद करण्यात आले. खेळाडूच्या मोबाइलवरही त्याची माहिती देण्यात आली. अशी अत्याधुनिक सुविधा सांगलीतच प्रथम करण्यात आली होती. 

सांगली जिल्हा ऍमॅच्युअर ऍथलेटिक असोसिएशनचे बापू समलेवाले, संजय पाटील, महेश जाधव, प्रा. गणेश सिंहासने, राजेंद्र कदम, जितेंद्र पाटील, युवराज खटके, समीर सनदी, सुभाष सूर्यवंशी, राजेंद्र कुडलापगोळ, संतोष पाटील, संजय कोळी यांनी पंच म्हणून काम पाहिले. 

जिल्हाधिकारी धावले... 

शहीद अशोक कामटे फाऊंडेशनतर्फे यंदा ही स्पर्धा व्यापक प्रमाणात घेण्यात आली. सांगली ब्रॅंडिंगचा संदेश देणाऱ्या स्पर्धेत जिल्हाधिकारी शेखर गायकवड स्वतः धावले. ही बाब सांगलीकरांसाठी अभिमानास्पद आहे. त्याच्यासोबत डॉक्‍टर, बांधकाम व्यावसायिक, वकील, सरकारी अधिकारी, शिक्षकांचाही सहभाग होता. विशेष म्हणजे नौदलातील सनद पाटील यांचा सहभाग होता. खास नौदलाची परवानगी घेऊन ते सहभागी झाले होते. 

निकाल असा 
* 21 किलोमीटर - सचिन पाटील (कोल्हापूर), आदिनाथ भोसले (सातारा), परशुराम भोई (कोल्हापूर). 
* 10 किलोमीटर 
पुरुष - अक्षय आळंदे (इचलकरंजी), सिद्धार्थ गुणदी (बेळगाव), भागवत दुधाळ (सांगली). 
महिला - रेखा रानगटे (सांगली), स्नेहल शिंगाडे (सातारा), सोनाली जाधव (कराड). 
* पाच किलोमीटर (फन रन) 
पुरुष - प्रवीण कांबळे (सांगली), प्रियजित बागडे (कोल्हापूर), दीपक ऐवळे (सांगली). 
महिला - तनया माळी, आरती परांजपे, गीताली मोहिते (सर्व सांगली). 
शालेय गट 
* 14 वर्षांखालील - मुले -
ओंकार पनाळकर, इंद्रजित पाटील, सुमंत राजभर, मुली - साक्षी कुरंगी, निकीता बोंगार्डे, साक्षी जड्याळ. 
* 12 वर्षांखालील - मुले - यश वाकुर्डे, प्रशांत वाकुर्डे, आऊजी घागरे, मुली - स्वाती घागरे, चैताली जांभळे, शीतल बोरगावे. 
* 10 वर्षांखालील - मुले - आकाश टिपरे, सोहन रावळ, कलीम मुजावर, मुली - मोहिनी आदमापुरे, सिद्धी बामणे, कमलाना चौधरी. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com