दुष्काळी भागात 24 तासात टॅंकर देणार - सदाभाऊ खोत 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 डिसेंबर 2018

सांगली - राज्यात 1972 ला अन्नधान्याचा दुष्काळ होता. यंदाचा दुष्काळ पाणी आणि चार्‍याचा आहे. दोन्ही संकटाला सामोरे जावे लागत आहे. तहसिलदारांच्या अहवालानंतर 24 तासात टँकर आणि गरज भासेल तिथे चारा दिला जाईल, अशी ग्वाही कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

ते म्हणाले, दुष्काळाची पाहणी करण्यासाठी नुकतेच केंद्रीय पथक येऊन गेले. मी देखील दौरे केले. आढावा बैठका घेतल्या. टंचाईसंदर्भात प्रांतांना अधिकार दिले आहेत. रोहयो कामाच्या अटी शिथील केल्या आहेत. केंद्रीय कमिटीबरोबर मुंबईत बैठक झाली आहे. त्यामध्ये दुष्काळाचा आढावा घेतला गेला. 7900 कोटीचा टंचाई आढावा केंद्राला सादर केला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी केंद्रातील वरिष्ठ अधिकार्‍यांशी चर्चा केली आहे. आम्हाला लवकरच मदत मिळेल. ज्यांनी पिकविमा घेतला आहे, त्यांना मदत केली जाईल.  केंद्राची मदत प्राप्त झाल्यानंतर त्यात राज्याचा हिस्सा घालून मदत केली जाईल.

ते पुढे म्हणाले, यंदा पाणी आणि चार्‍याचा दुष्काळ आहे. तहसिलदारांचा अहवाल आल्यानंतर 24 तासात टॅन्कर दिला जाईल. तसेच गरज भासेल तिथे चारा छावणी निर्माण केली जाईल. त्याबाबत प्रांत आणि तहसिलदार यांना अधिकार दिले जातील. दुष्काळासाठी आतापर्यँत जानेवारी व फेब्रुवारीमध्ये उपाय योजले जातात. परंतु या सरकारने वाट न पाहता उपाय योजना केल्या आहेत. राज्यात अनेक ठिकाणी टॅन्कर सुरु केले आहेत. दुष्काळी तालुक्यांच्या बैठका घेतल्या जातील.

Web Title: Sadabhau Khot comment