सदाभाऊ खोत-मोहनराव कदम आज महापालिकेच्या व्यासपीठावर 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 जानेवारी 2017

सांगली - आमदार मोहनराव कदम आणि पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत उद्या (ता. 7) महापालिकेत सत्कारानिमित्त एकत्र येत आहेत. मंत्रिपदी आरूढ झाल्यानंतर पहिल्या आढावा बैठकीसाठी सदाभाऊ, तर आमदार म्हणून निवडल्यानंतर मोहनराव प्रथमच महापालिकेत येत आहेत. दोघांचेही वर्तमानातील समान राजकीय शत्रू असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी काही दिवसांपासून या दोघांनाही लक्ष्य केले आहे. या पार्श्‍वभूमीवर उद्या सायंकाळी चार वाजता वसंतदादा सभागृहात हा कार्यक्रम होत आहे. सत्ताधारी गटाच्या नेत्या जयश्री पाटील यांची प्रमुख उपस्थिती आहे. महापौर हारुण शिकलगार, सुरेश आवटी यांनी आज माहिती दिली. 

ते म्हणाले,""महापालिकेच्या ड्रेनेज व पाणी योजनांच्या निधीचा प्रश्‍न शासनाकडे प्रलंबित आहे. मंत्री खोत यांनी जातीने लक्ष घालून गरज वाटल्यास मुख्यमंत्र्यांसोबत बैठकही घेऊ, असे सांगितले आहे. उद्या सर्वच अधिकाऱ्यांसमवेत मंत्री आढावा बैठक घेत आहेत.'' 
स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडून आलेल्या श्री. कदम यांचा महापालिकेच्यावतीने नागरी सत्कार केला जाणार आहे. हा सत्कार सर्वपक्षीय असेल असेही महापौरांनी स्पष्ट केले. माजी आमदार संभाजी पवार यांच्या नेतृत्वाखालील स्वाभिमानी आघाडीचाही उद्या खोत यांच्या उपस्थितीत महापालिकेत कार्यक्रम होणार आहे. आघाडीच्या गटनेतेपदी जगन्नाथ गोंधळे यांची निवड झाली आहे. त्यांचा सत्कार होईल.

Web Title: Sadabhau Khot-Mohanrao kadam today municipal platform