'वाळव्यात आमदरीकीला इच्छुकांची मांदियाळी'

sadabhau khot speak about Walva Election
sadabhau khot speak about Walva Election

इस्लामपूर- वाळवा तालुक्‍यात विरोधकांची ताकद आहे. ती बांधताना मध्यस्थाची दमछाक होते, आणि त्यातूनही विरोधक एकवटले तर इतिहास घडतो हे नगरपालिका निवडणूकीत दिसले आहे. मात्र, येणाऱ्या विधानसभा निवडणूकीसाठी सगळेच आमदार म्हणून इच्छुक आहेत. यातील एकच आमदार होऊ शकतो हे लक्षात ठेवावे असे प्रतिपादन कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केले.

युवा नेते राहुल महाडिक यांच्या वाढदिवसानिमीत्त येथील पुष्कर मंगल कार्यालयात आयोजित सर्वपक्षीय कार्यक्रमात ते बोलत होते. आमदार सुधीर गाडगीळ, वनश्री नानासाहेब महाडिक, नगराध्यक्ष निशिकांत पाटील, जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे सी. बी. पाटील, सम्राट महाडिक, कपिल ओसवाल, अमित ओसवाल, सतिश महाडिक, उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील, संजय कोरे, वैभव पवार, विक्रम पाटील, भीमराव माने, जिल्हा परिषद सदस्य सुरेखा जाधव, सुरेखा आडमुठे, वैभव शिंदे, जगन्नाथ माळी यांच्यासह तालुक्‍यातील सर्वच राजकीय पक्षातील पदाधिकारी उपस्थित होते.

सदाभाऊ खोत म्हणाले, "विधानसभा व लोकसभेचे मैदान जवळ आल्यामुळे सर्वांच्या जोर बैठका सुरु आहेत. इस्लामपूर व शिराळा मतदारसंघात अनेकजण सत्ताधाऱ्यांच्या विरोधात इच्छुक आहेत. यापुर्वी विरोधकांना या मतदारसंघात उमेदवार शोधताना दमछाक व्हायची. मात्र आता अनेक इच्छुक आहेत. यावरुन विरोधकांचा वाढलेला विश्‍वास व निवडून येण्याची खात्री दिसून येते. राहुल महाडिक यांचा सर्वपक्षीय वाढदिवस साजरा झाला आहे, त्याला कारण त्यांचे सर्वच राजकीय पक्षात असलेले जवळचे संबंध दिसून येतात.

यावेळी, 'नगराध्यक्ष निशिकांत पाटील म्हणाले की, "राहुल महाडिक यांना वाढदिवसानिमीत्त दिलेली तलवार येणाऱ्या 2019 च्या निवडणूकीत राष्ट्रवादीचा पाडाव करण्यासाठी वापरायची आहे.  तसेच, 'राहुल महाडिक म्हणाले की, 2019 च्या निवडणूकीत आम्ही परिवर्तनासाठी उतरणार आहोत. यावेळी व्यासपीठावरील सर्वांनी आमच्या बरोबर यावे अशी आमची इच्छा आहे. माझी कामाची पध्दत नुसते बोलून नव्हे तर कोणतीही गोष्ट करुन दाखवायची आहे. सत्ता आली तरी आम्हाला आम्ही विरोधातच असल्यासारखे वाटते. आजपर्यंत आम्ही सर्वांना ताकद देण्याची व विरोधकांच्या संकलनाचे काम केले. त्यामुळे यावेळी आता सर्वांनी आमच्या पाठीशी उभे रहावे. यावेळी तालुक्‍यातील बहुतांशी युवावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com