नोटा बंदीचा ग्रामीण भागात परिणाम नाही !: खोत

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 डिसेंबर 2016

जिल्हा बॅंकेवरील निर्बंर्धांच्या वक्‍तव्यांवर युटर्न

सांगली : नोटा बंदीच्या निर्णयामुळे जिल्ह्यातील ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडली असल्याचे चित्र आहे, मात्र तरी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी मात्र ग्रामीणभागात नोट बंदीमुळे फार काही विपरीत परिणाम झालेला नाही, असे मत व्यक्‍त करून धक्‍का दिला. जिल्हा मध्यवर्ती बॅंकांवरील निर्बंधाचे यापूर्वी त्यांनी समर्थंन केले होते मात्र आज पत्रकारांशी बोलताना त्यांनी युटर्न घेतला. हे निर्बंध उठविण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यांशी चर्चा सुरू असल्याचे त्यांनी नमुद केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात क्रांतीवीर पांडुमास्तर स्मारक समितीच्या बैठकीनंतर श्री. खोत पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले,"" नोटाबंदीमुळे नागरिकांची कुचंबना होत आहे. त्यातून मार्ग काढण्याचा सरकारचा प्रयत्न सुरु आहे. नवीन पर्याय स्वीकारण्यासाठी थोडा त्रास होणार. शहरात चलन तुटवडा जाणवत आहे. मात्र लवकरच यावर मार्ग निघेल. तर ग्रामीण भागात नोटाबंदीमुळे फार मोठी अडचण निर्माण झालेली नाही. ''

दरम्यान जिल्हा बॅंकांत भ्रष्टाचार आहे, त्यांना नोट बदलीसाठी परवानगी देवू नका असे त्यांनी केलेले विधान मात्र आता मागे घेतले आहे. आज त्यांनी याबाबत "यु टर्न' घेत जिल्हा बॅंकांना अर्थ पुरवठा करणे गरजेचे असल्याचे मत आज व्यक्त केले. जिल्हा मध्यवर्ती बॅंकेत ग्रामीण भागातील लोकांचे व्यवहार होतात. ऊस बीले, पीक कर्ज, दुध बीले जिल्हा बॅंकेत जमा होतात. त्यामुळे या बॅंकांना अर्थपुरवठा करणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले. जिल्हा बॅंकेवर घातलेले निर्बंध उठविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्‌टी यांनी केंद्रिय अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेऊन चर्चा केली आहे. त्याबाबत निर्णय लवकरच घेतला होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

मराठा आरक्षणासाठी सकारात्मक
दरम्यान मराठा आरक्षणाबाबत ते म्हणाले, ""हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणावर सविस्तर चर्चा झाली. सरकारने आरक्षणाबाबत भक्कम पुरावे गोळा करुन सादर केले आहेत. सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करत आहे. तसेच धनगर समाजालाही आरक्षण देण्यासाठी पुरावे गोळा केले आहेत.''

दिलीप पाटील यांना टोला
""सदू, गावाकडे ये ऊसाने फोडतो'' असे जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष दिलीप पाटील म्हणाले होते. मात्र यावर प्रतिक्रिया टाळणारे सदाभाऊ आज नाव घेता टोला लगावून गेले. ते म्हणाले, "जिल्हा मध्यवर्ती बॅंकांवर निर्बंध घालण्याचा निर्णय रिझर्व्ह बॅंकेने घेतला आहे. हा निर्णय केवळ सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅंकेसाठी नाही, तर संपूर्ण देशातील मध्यवर्ती बॅंकांबाबत आहे. या बॅंकांचा पूर्वीचा इतिहास पाहून त्यांच्यावर निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला असेल तर तो काही माझ्या हातात नाही. त्यामुळे कोणाला व्यक्‍तिगत बोललो नाही. जिल्हा सहकारी मध्यवर्ती बॅंक काही फक्‍त सांगलीत नाही तर त्या सर्वत्र आहेत, असा टोला त्यांनी लगावला.

Web Title: sadabhau khot's statement on currency ban