सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेच्या जिल्हाध्यक्षांचा राजीनामा

हुकूम मुलाणी
रविवार, 22 जुलै 2018

खरीप हंगामासाठीचा पिकविमा मिळवून देण्यातील अपयश ते शेतकर्‍यांच्या विविध मागण्याकडे केलेले दुर्लक्ष लक्षात घेऊन कृषी मंत्री सदाभाऊ खोकत यांच्या रयत क्रांती संघटनेच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देत असल्याचे प्रा. संतोष पवार यांनी सांगितले.

मंगळवेढा - मराठा आरक्षण मागणीकडे दुर्लक्ष व 2017-18 चा खरीप हंगामासाठीचा पिकविमा मिळवून देण्यातील अपयश ते शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांकडे केलेले दुर्लक्ष लक्षात घेऊन कृषी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देत असल्याचे प्रा. संतोष पवार यांनी सांगितले.

मराठा समाजाने आपल्या आरक्षण व इतर न्याय मागण्यासाठी मरवडे - विजापुर हायवेवर छत्रपती शिवाजी महाराज चौक, मरवडे येथे रास्ता रोको व चक्काजाम आंदोलन केले होते. त्यावेळी ते बोलत होते. 

यावेळी मरवडे व परीसरातील मराठा समाजातील व इतर समाजाचे शेकडोंच्या संख्येने युवक उपस्थित होते. यावेळी अशोकभाऊ पवार, दादासो पवार, सुरेश पवार, धन्यकुमार पाटील, विशाल घुले डॉ. सुनिल गवळी, महेश गायकवाड, दत्ता मासाळ सुदर्शन घुले, आदिनाथ पवार, विवेक जाधव, विठ्ठलराव पाटील, विठ्ठल चौधरी, बाळू पवार, अमोल जाधव, बालाजी पवार, प्रशांत सुर्यवंशी, गणेश जाधव, बजरंग गायकवाड, दिलीप गायकवाड, देवनाथ जाधव आदी उपस्थित होते. भाषणातून निवृत्ती जाधव, आण्णासाहेब गणपाटील, संगशेट्टी, निलेश स्वामी, विकास दुधाळ यांनी समाजाच्या समस्या व सरकारचे दुर्लक्ष मांडले.

 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Sadbhau Khots Rayat Kranti Organizations District President Resigns