पुत्राच्या जोडणीसाठी सदाभाऊ-कोरेंत गुफ्तगू 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 फेब्रुवारी 2017

वारणानगर - वारणा कारखाना कार्यक्षेत्रातील बागणी मतदारसंघातून रिंगणात उतरवलेल्या मुलाच्या विजयासाठी पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज दुपारी जनसुराज्यचे संस्थापक विनय कोरे यांची भेट घेऊन मदतीचे साकडे घातले. यावेळी त्यांनी बंद खोलीत सुमारे अर्धा तास कोरे यांच्याशी चर्चा केली. खोत यांचा मुलगा सागर खोत बागणी (जि. सांगली) जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे. मतदारसंघातील काही गावे वारणेच्या कार्यक्षेत्रात येतात. त्यामुळे ही भेट झाल्याची चर्चा आहे. 

यावेळी मंत्री खोत म्हणाले, ""मी लढवय्या चळवळीतील कार्यकर्ता असून, प्रस्थापितांच्या विरोधात लढण्यासाठी लोकांच्या आग्रहास्तव मुलाला उमेदवारी दिली. त्यामुळे घराणेशाहीचा प्रश्‍नच येत नाही. मी वीस वर्षे राजकारणात असेन, तोपर्यंत मुलगा पन्नास वर्षांचा होईल. तोपर्यंत त्याने राजकारणात यायचे नाही का ?'' 

भाजपमुळे शेट्टी आणि तुमच्यात दरी निर्माण झाली आहे काय ? यावर ते म्हणाले, ""स्वाभिमानी भाजपचा घटकपक्ष असून, भाजप फूट का पाडेल. स्वाभिमानीत फूट पडेल, असे म्हणणे अज्ञानाचे लक्षण आहे. सदाभाऊला संघर्ष नवीन नाही. त्यामुळे काळाच्या ओघातच हा संभ्रम दूर होईल.'' 

मुलगा सागरला बागणीतून उमेदवारी दिल्याने शेट्टींशी तुमचे बिनसले आहे काय? यावर ते म्हणाले, ""प्रस्थापितांना पराभूत करण्यासाठीच मुलाला लोकांनी उमेदवारी देणे भाग पाडले. त्यामुळे घराणेशाहीचा प्रश्‍नच येत नाही. नवरा-बायकोत दुसऱ्याच्या सांगण्यावर वाद होत असतील तर ते अज्ञानपणाचे लक्षण आहे; पण सदाभाऊ सज्ञान आहे. सदाभाऊ लढणारा कार्यकर्ता आहे. शेतकरी अस्वस्थ होणार नाहीत असे माझ्याकडून कधीच कृत्य होणार नाही.'' 

यावेळी जनसुराज्य शक्तीचे युवा प्रदेशाध्यक्ष समित कदम, विश्‍वास जाधव उपस्थित होते. 

सांगली जिल्ह्यात भाजप, स्वाभिमानीसह अन्य अशी आघाडी असून, 62 पैकी 22 ठिकाणी राष्ट्रवादीला उमेदवार मिळालेला नाही. या आघाडीचीच सत्ता येणार असून, सर्वाधिक फटका राष्ट्रवादीला बसला आहे. हा पक्ष तिसऱ्या क्रमांकावर जाईल. 
सदाभाऊ खोत, कृषी व पणन राज्यमंत्री

Web Title: sadhabhau khot - vinay kore