'सुरक्षित ग्राम' कार्यशाळा मलवडी येथे संपन्न

रुपेश कदम :
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

मलवडी : कटगुण येथील ग्रामपरिवर्तन संस्था, सेव्ह दि चाईल्ड इंडिया व माय चॉइसेस फाऊंडेशन यांच्यामार्फत महिला, मुली, मुले यांचे  सुरक्षिततेच्या दृष्टीने मानवी अनैतिक वाहतूक रोखून, मानवी तस्करी रोखणे याबाबतच्या उपाय योजनांविषयी कार्यशाळा मलवडी येथे संपन्न झाली.

सदर उपक्रमांतर्गत श्री खंडोबा मंदीरामध्ये झालेल्या कार्यक्रमात ग्रामस्थांना विशेष उपाय योजना बाबत मार्गदर्शन करण्यात आले. आदर्श माता, सुरक्षित गाव, आदर्श आई व मुलाचे संरक्षण याबाबत रेड अलर्ट प्रोजेक्ट चे विशेष प्रशिक्षक रवी इंदलकर यांनी मार्गदर्शन केले.
त्रिंबकराव काळे विद्यालय व ज्युनिअर कॉलेज येथे झालेल्या कार्यक्रमामध्ये मुंबई येथील सेव्ह द चिल्ड्रेन इंडिया टीमचे प्रवीण कदम, अनिल परीट, राहूल सोनवणे, ग्रामपरिवर्तनचे प्रताप गोरे, रवी इंदलकर यांनी विशेष कृती व हेल्प लाईनच्या माध्यमातून आपलं गाव व आपणही कसे सुरक्षित राहवू शकतो याबाबत प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.  

यावेळी सुरक्षित गाव याविषयीची माहिती पुस्तके विद्यार्थ्यांना वाटण्यात आली. पुस्तके पाहून विद्यार्थी भारावून गेले व त्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला. या उपक्रमाला सरपंच दादासाहेब जगदाळे, मुख्याध्यापक एस. आर. दोरगे, ग्रामपरिवर्तन संस्थेचे कार्यवाह प्रताप गोरे यांचे सहकार्य लाभले.
 
Web Title: 'Safe Village' workshop concluded at Malwadi