सदाभाऊंचे चिरंजीव भाजप युवा मोर्चाचे सांगली जिल्हाध्यक्ष

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 जुलै 2019

‘युवकांच्या माध्यमातून पक्षाची ध्येयधोरणे पोहचवण्याचा प्रयत्न करणार आहे. तसेच पक्ष वाढीसाठी तरुणांचे संघटन करून त्यांच्या ऊर्जेचा सकारात्मक प्रयत्न करु. निश्‍चितच भारतीय जनता पक्षाला गावागावात व तळागाळात पोहचविण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहीन.

- सागर खोत

इस्लामपूर - कृषी राज्यमंत्री नामदार सदाभाऊ खोत यांचे चिरंजीव सागर खोत यांची मुंबई येथे भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाच्या सांगली जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली.

भारतीय जनता पक्षाचे राज्याचे नूतन प्रदेशाध्यक्ष व राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील व युवा मोर्चाचे राज्याचे प्रदेशाध्यक्ष आमदार योगेश टिळेकर यांच्या हस्ते निवडीचे पत्र त्यांना देण्यात आले. यावेळी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, सांगली जिल्हाध्यक्ष आमदार पृथ्वीराज देशमुख, भाजप सातारा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, वाळवा पंचायत समितीचे विरोधी गटनेते राहुल महाडिक, पै. भीमराव माने, शशिकांत शेळके, अभिषेक भांबुरे आदी उपस्थित होते.

ग्रामीण भागातील संघटन व कौशल्यामुळे भारतीय जनता पक्षाने त्यांना ही नवी संधी दिली आहे. त्यांनी यापूर्वी जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली होती. तालुक्‍यातील व जिल्ह्यातील तरुणांच्या विविध प्रश्नांची त्यांना जाण आहे. त्यामुळेच त्यांना ही संधी मिळाली.

‘युवकांच्या माध्यमातून पक्षाची ध्येयधोरणे पोहचवण्याचा प्रयत्न करणार आहे. तसेच पक्ष वाढीसाठी तरुणांचे संघटन करून त्यांच्या ऊर्जेचा सकारात्मक प्रयत्न करु. निश्‍चितच भारतीय जनता पक्षाला गावागावात व तळागाळात पोहचविण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहीन.

- सागर खोत

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sagar Khot as BJP Yuva Morcha Sangli District president