सांगलीला आता 2 पूर्ण खासदार; लोकसभा मतदार संघाची होणार पुनर्रचना

केंद्र शासनाने लोकसभा मतदार संघांचे पुनर्सिमांकन करण्याचे ठरवले आहे.
politics
politicsesakal
Summary

केंद्र शासनाने लोकसभा मतदार संघांचे पुनर्सिमांकन करण्याचे ठरवले आहे.

सांगली : केंद्र शासनाने लोकसभा मतदार संघांचे पुनर्सिमांकन करण्याचे ठरवले आहे. त्यानुसार आता लोकसभा मतदार संघाची पुनर्रचना होणार असून त्यात जिल्ह्याला दोन पूर्ण खासदार मिळतील. हा निर्णय २०२४ पूर्वी होतोय की नंतर याबाबत अद्याप स्पष्टता नाही. जिल्ह्यात सध्या सहा विधानसभा मतदार संघांचा समावेश असलेला सांगली पूर्ण मतदार संघ असून हातकणंगले मतदार संघात वाळवा आणि शिराळा हे दोन तालुके आहेत. त्याआधी कराड मतदार संघातील जिल्ह्यातील काही भाग होता.

राज्यातून सध्या ४८ मतदार संघ असून त्यात आता ३६ ने वाढ होणार आहे. एकूण मतदार संघ ८४ होणार आहेत. दर दहा लाख मतदार संख्येला एक खासदार या नियमानुसार आणि सन २०२१ च्या जनगणनेच्या आधारे ही रचना केली जाणार आहे. जिल्ह्याची मतदार संख्या आता २३ लाख ७५ हजाराहून अधिक झाली आहे. सहाजिकच, या नियमानुसार जिल्ह्याला दोन खासदार मिळणार आहेत.

politics
मोठ्या घोषणा करणाऱ्या अजित पवारांनी विद्यार्थ्यांची दिशाभूल केली

घटनेच्या कलम ८१ नुसार देशातील खासदार संख्येत मोठी वाढ करण्याचे केंद्राचे धोरण आहे. उत्तर प्रदेशात ६३, महाराष्ट्र ३६, बंगाल ३१, बिहार ३० या तीन राज्यांतून प्रामुख्याने जागा वाढणार आहेत. सध्याची संसदेची आसन क्षमता पाहता एवढे लोक कुठे बसणार, असा मुद्दा चर्चेत आहे, त्याला उत्तर म्हणजे सेंट्रल विस्टा या नवीन संसदेचे बांधकाम. तेथे एक हजार खासदार बसू शकतात, अशी व्यवस्था आहे. त्यामुळे सेंट्रल विस्टाचे उद्घाटन, २०२४ ची निवडणूक आणि नवे धोरण हे सगळे गणित जमून येईल, असे जाणकार सांगत आहेत. १९७७ ला शेवटचे सीमांकन झाले होते.

असा असू शकेल, नवा मतदार संघ

जिल्ह्यात दहा तालुके आणि आठ विधानसभा मतदार संघ आहेत. लोकसभेची रचना ही तालुक्यांपेक्षा विधानसभा मतदार संघ अशी केली जाते. जिल्ह्यातील आठ मतदार संघांपैकी सांगली, मिरज, तासगाव-कवठेमहांकाळ आणि जत अशी सलगता आहे. इस्लामपूर, शिराळा, पलूस-कडेगाव आणि खानापूर-आटपाडी अशी सलगता आहे. त्याआधारे विचार केला तर अशी रचना होऊ शकते. अर्थात, त्याबाबतचे धोरण निश्‍चित व्हायचे आहे.

politics
राज्यात आज मुसळधार; उद्यापासून पावसाची तीव्रता कमी होणार?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com