'ज्ञानेश्वर'ला राज्य शासनाचा सहकार भूषण पुरस्कार प्रदान

newase
newase

नेवासे :  भेंडे (ता. नेवासे) येथील श्री ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याला महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाचे वतीने देण्यात आलेला सहकार भूषण पुरस्कार राज्याचे सहकार,पणन व वस्त्रद्योग  मंत्री सुभाष देशमुख यांचे हस्ते प्रदान करण्यात आला.51 हजार रुपये रोख रक्कम, प्रशस्तीपत्र व समृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

राज्यातील सहकार क्षेत्रात उत्कृष्ट काम करीत असलेल्या सहकारी संस्थांना सहकार महर्षी, सहकार भूषण व सहकार निष्ठ पुरस्काराचे वितरण काल बुधवार (ता.31) ऑक्टोबर रोजी मुंबई येथील रंग शारदा सभागृहात करण्यात आले.

ज्ञानेश्वर कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील,उपाध्यक्ष पांडुरंग अभंग, संचालक काकासाहेब नरवडे, मोहन देशमुख, काशीनाथ नवले, शिवाजी गवळी, अनिल हापसे, अशोक मिसाळ, पंडितराव भोसले, जगन्नाथ कोरडे व संचालक मंडळाने  राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचे हस्ते पुरस्कार स्वीकारला.

आमदार जयंत पाटील,आमदार आशिष शेलार, आमदार भाई पाटील, आमदार प्रवीण दरेकर, राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, राज्यस्तरीय लेखा समितीचे अध्यक्ष सचिन पटवर्धन, सहकार प्रधान सचिव श्रीमती आभा शुक्ला,वस्त्र उद्योग प्रधान सचिव अतुल पाटणे,सहकार आयुक्त सतीश सोनी, साखर आयुक्त संभाजीराव कडू, प्रादेशिक उपसंचालक साखर राजकुमार पाटील,रोहन कावट, ज्ञानेश्वरचे संचालक प्रा नारायण म्हस्के, रावसाहेब निकम, सुधाकर लांडे, मोहन भगत, रामदास गोल्हार, माणिक थोरात आदी उपस्थित होते.

लोकनेते मारुतरावजी घुले पाटील विविध राजकीय विचारांच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन प्रतिदिन 1250 मेट्रिक टन गाळप क्षमता असलेला ज्ञानेश्वर कारखान्याची स्थापना केली.1975-75 मध्ये पहिला गळीत हंगाम यशस्वी केला.वेळोवेळी गाळप क्षमता वाढ करण्यात आल्याने कारखान्याची आजची प्रतिदिन गाळप क्षमता 7 हजार मेट्रिक टन आहे. प्रतिदिन 45 हजार लिटर उत्पादन क्षमता असलेली डिस्टिलरी,प्रतिदिन 30 हजार लिटर क्षमतेचा इथेनॉल प्रकल्प, 31.5 मेगावॉट सहवीजनिर्मिती प्रकल्प,कृषी विज्ञान केंद्र,बायोकंपोस्ट प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यरत आहे.

आज पर्यंतचे पुरस्कार...
० राष्ट्रीय उत्पादकता परिषदेचा प्रथम क्रमांकाचा उत्कृष्ठ कार्यक्षमता पुरस्कार (1985-86)                        
० केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाचा मिल मधील  उत्कृष्ठ तांत्रिक कार्यक्षमतेचा पुरस्कार  (1987-88)
० नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑफ शुगर फॅक्टरीजचा द्वितीय क्रमांकाचा उत्कृष्ठ कार्यक्षमता पुरस्कार (1988-88)
० व्हीएसआय,पुणे यांचा रेड्युस्ड ओव्हरऑल रिकव्हरीबद्दलचा द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार (1993-94)
० आयएसओ 9002 प्रमाणपत्र  
० लोकनेते मारुतरावजी घुले पाटील यांना इंदिरा गांधी प्रियदर्शनी पुरस्कार,भारतीय उद्योगरत्न पुरस्कार,सहकार भूषण पुरस्कार
० ज्ञानेश्वर उद्योग समुहाचे प्रमुख मार्गदर्शक नरेंद्र घुले पाटील यांना भारत ज्योती अवॉर्ड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com