साहेब, सांगा आम्ही कसं जगायचं? 

अण्णा काळे 
गुरुवार, 6 डिसेंबर 2018

करमाळा - सांगा साहेब, आम्ही कसं जगायचं? पेयाला पाणी नाही... का जनावरांला चारा नाही... सावकाराचं कर्ज काढलंय... ते देयाचं कसं? बॅंकेचं कर्ज काढलयं, आता बॅंकेकडे जायला तोंड नाही! आवं आम्हाला आता औषध प्यायची वेळ आलीया... अधिकारी येत्यात, नुसता सर्व्हे करून जात्यात.. कर्जमाफी नाही की पीक विमा मिळाला नाही, का कुठली मदत नाही साहेब... आता जर मदत मिळाली नाही, तर आम्ही आत्महत्या करू, अशी व्यथा जातेगाव (ता. करमाळा) येथील शेतकरी किसन वारे (वय 67) यांनी दुष्काळाची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकासमोर मांडली. 

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

बुधवारी (ता. 5) करमाळा तालुक्‍यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथकाने जातेगाव येथे भेट दिली. या वेळी वारे यांनी ही व्यथा मांडली. वारे यांची व्यथा ऐकून पथकातील अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. केंद्रीय पथकातील सुभाषचंद्र मीना, एम. जी. टेंभुर्णे व विजय ठाकरे यांनी थेट शेतकऱ्यांशी संवाद साधला. 

केंद्रीय पथक साधारणपणे साडेपाच वाजता जातेगावला पोहोचले. या वेळी पथकाने वारे यांच्या शेताला भेट दिली. दुष्काळी परिस्थितीविषयी माहिती सांगतांना वारे यांना गहीवरून आले. वारे यांनी दोन एकर शेतीवर या वर्षी कापसाची लागवड केली. मात्र पाऊस न पडल्याने अक्षरश- कापूस जळून गेला. पाळी, पेरणी, बी, खते मिळून एकरी सहा हजार खर्च झाला आहे. दोन एकर कापूस लागवडीसाठी खर्च बारा हजार रुपये लागले. मात्र कसलेही उत्पन्न मिळाले नाही, अशी माहिती वारे यांनी दिली. 

Web Title: Saheb tell us how to live