देश-विदेशातील साईमंदिरांमध्ये अन्नदान व रक्तदान सुरू करावे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 डिसेंबर 2016

शिर्डी,- पुढील वर्षीपासून सुरू होत असलेल्या साईसमाधी शताब्दी वर्षापासून देश-विदेशातील प्रत्येक साईमंदिरात आठवड्यातून एकदा अन्नदान व रक्तदानाचा उपक्रम सुरू करावा. तसेच, रुग्णसेवा व अवयवदानाची चळवळ हाती घ्यावी, अशी अपेक्षा साई संस्थानाचे अध्यक्ष सुरेश हावरे यांनी रविवारी व्यक्त केली.

साई संस्थानाने आयोजित केलेल्या जागतिक साईमंदिर विश्‍वस्त परिषदेच्या उद्‌घाटनप्रसंगी हावरे बोलत होते. या परिषदेत देश-विदेशांतील साईमंदिरांचे सुमारे अडीच हजार विश्‍वस्त उपस्थित होते. हावरे म्हणाले, ""कुणाचेही पाठबळ नसताना साईंचे भक्त जगभरात साईबाबांच्या शिकवणीचा प्रचार आणि प्रसार करीत आहेत. अनुभूती ही एकमेव शक्ती त्यामागे आहे. जगातील ही सर्वांत मोठी भक्तिमय चळवळ आहे. देशात साईबाबांची तीन हजार आणि विदेशात चारशेहून अधिक मंदिरे आहेत. त्यांच्यात समन्वय असायला हवा. बाबांनी गरिबांची आणि रुग्णांची सेवा केली. त्याचे अनुकरण सर्व साईमंदिरांच्या विश्‍वस्त मंडळांनी करावे.''

शिर्डीत आजपासून "टाइम-दर्शन'
तिरुपतीच्या धर्तीवर शिर्डीच्या साईमंदिरात सर्व भाविकांसाठी "टाइम-दर्शन' ही सुविधा उद्यापासून (ता. 12) सुरू केली जाईल. त्यामुळे रांगेत उभे न राहता पंधरा ते वीस मिनिटांच्या कालावधीत प्रत्येकाला साईदर्शन घेता येईल. पुढील वर्षभर साई संस्थानच्या प्रसादालयात भाविकांना मोफत भोजन दिले जाईल. दर्शनरांगेतील सर्व भाविकांना मोफत चहा व दूध देण्याचा उपक्रम यापूर्वीच सुरू करण्यात आला आहे, अशी माहिती या वेळी साई संस्थानाचे अध्यक्ष सुरेश हावरे यांनी या परिषदेत दिली.

Web Title: sai temple shall start donation

टॅग्स