रंग रेषांच्या दुनियेत दंगली चिमुकली (video)

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 जानेवारी 2020

तिन पिढ्यांना जोडणाऱ्या ‘सकाळ’ चित्रकला स्पर्धा बाल चित्रकारांसाठी जणू एक पर्वणी असते. पु. ना. गाडगीळ आणि सन्स लि. प्रस्तुत व पॉवर्डबाय लोकमान्य मल्टीपर्पज को. ऑपरेटीव्ह सोसायटी लि. असलेली ‘सकाळ’ चित्रकला स्पर्धा २०२० ची विद्यार्थी आतुरतेने वाट पाहत असल्याचे प्रतिसादावरुन दिसून येत होते. एकुण चार गटात असलेल्या या स्पर्धेसाठी विविध विषय देण्यात आले होते.

सोलापूर : सोलापूर शहरात ‘सकाळ’ चित्रकला स्पर्धेस उत्साहात रविवारी (ता. १२) सकाळी प्रारंभ झाला. विविध गटांमध्ये सुरु झालेल्या या स्पर्धेस बालमित्रांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. रंगरेषांच्या दुनियेत दंग होत चिमुकल्यांनी स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटला. 

 

Image may contain: 7 people, people sitting, crowd and outdoor

तिन पिढ्यांना जोडणाऱ्या ‘सकाळ’ चित्रकला स्पर्धा बाल चित्रकारांसाठी जणू एक पर्वणी असते. पु. ना. गाडगीळ आणि सन्स लि. प्रस्तुत व पॉवर्डबाय लोकमान्य मल्टीपर्पज को. ऑपरेटीव्ह सोसायटी लि. असलेली ‘सकाळ’ चित्रकला स्पर्धा २०२० ची विद्यार्थी आतुरतेने वाट पाहत असल्याचे प्रतिसादावरुन दिसून येत होते. एकुण चार गटात असलेल्या या स्पर्धेसाठी विविध विषय देण्यात आले होते. सकाळी थोडी थंडी कमी असली तरी धुक्याच्या मलमली चादरीने अवकाश व्यापून गेला असताना विद्यार्थ्यांची पाऊले परिक्षा केंद्राकडे मोठ्ंया आतुरतेने वळत होती. आपण स्पर्धेसाठी नोंदणी केल्याचे दाखवण्यासाठी रांगा लागल्या होत्या. काही जणांच्या हातात कुपन तर काहींच्या हातात केंद्रावरच नोंदणी करण्यासाठी पैसे होते. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन ऑनलाईन नोंदणी केल्याचेही अनेक विद्यार्थी स्मार्ट फोनवर दाखवत होते. या स्पर्धेसाठी आपल्या चिमुकल्याला वेळेत केंद्रावर पोचता यावे यासाठी पालकांनीही सकाळपासूनच वेळे आधी केंद्रावर येत पाल्यांचा हट्ट पुरवल्याचे दिसून आले. चित्र काढण्यासाठी पेन्सील, रंगीत खडू, पोस्टर कलर्स घेऊन विद्यार्थी उपस्थित होते. पेपर मिळाल्यांनतर चित्राची मांडणी आणि प्रमाणबद्धता याकडे सर्वजण लक्ष देत होते. विद्यार्थ्यांचा चिवचिवाट मनमोहून घेत होता. चित्रकलेतील आनंद आणि आपल्या मनातील भाव कागदावर उतरविण्यात दंग असणारे विद्यार्थी हे एक सुंदर चित्र परिक्षा केंद्रांवर होते.

Image may contain: 6 people, people sitting

असे आहेत गट
पाचवी ते सातवी (क गट) आणि आठवी ते दहावी (ड गट) या विद्यार्थ्यांसाठी सकाळी नऊ ते साडेदहा हा वेळेत देण्यात आला होता. पहिली ते दुसरी (अ गट) आणि तिसरी व चौथी (ब गट) यांना साडेदहा ते १२ असा वेळ देण्यात आला आहे.

शहर जिल्ह्याची स्थिती
सोलापूर शहरात १५ पेक्षा जास्त ठिकाणी या स्पर्धेस प्रारंभ झाला. तर जिल्ह्यातही १५ पेक्षा जास्त केंद्रांवर विद्यार्थी स्पर्धेत सहभागी झाले होते. सुरवसे हायस्कुलमध्ये स्पर्धेसाठी मोठा प्रतिसाद मिळाला. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सुजित आगरे, विनायक घाडगे, प्रदिप रिसबुड, शाम पाटील, अंबादास लोखंडे, पंकज साळुंखे आणि शेरशहा डोंगरी या कलाप्रेमी शिक्षक व सेवकांनी परिश्रम घेतले.

विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची स्पर्धा
गेली अनेक वर्ष ‘सकाळ’ महाराष्‌टभर राबवत असलेला हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्व विकासासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. मी गेली अनेक वर्ष या स्पर्धेशी जोडाला गेलो आहे. सकाळची ही स्पर्धा खूप महत्त्वाची आहे.
- शेरशहा डोंगरी, निवृत्त कला शिक्षक 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sakal chitrakal competition in Solapur