लिटल मास्‍टरांचा विराट  थरार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 फेब्रुवारी 2017

सकाळ स्कूल क्रिकेट लीगच्या दुसऱ्या सिझनची घोषणा

सातारा - उंच षटकार... भेदक गोलंदाजी... जबरदस्त विकेट कीपर... हवेत तरंगता झेल... ‘कमॉन कमॉन’चा ‘चिअर’... शानदार कॉमेंट्री... असे हे डोळ्यांचे पारणे फेडणारे क्षण पुन्हा एकदा सातारावासीयांना अनुभवण्यास मिळणार आहेत. ‘सकाळ माध्यम समूहा’ने यंदाही ‘सकाळ स्कूल क्रिकेट लीग (एसएससीएल)’ या शालेय क्रिकेट स्पर्धेचे २८ फेब्रुवारीपासून छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात आयोजन केले आहे. 

विविध खेळांमध्ये सातारा जिल्ह्यातील उदयोन्मुख खेळाडू चमकत आहेत. ‘सकाळ’ने नेहमीच क्रीडा स्पर्धा, कार्यशाळा आदींच्या माध्यमातून गुणवंत खेळाडूंना राज्य, राष्ट्रीय स्तरावर कौशल्य दाखविण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. गतवर्षी ‘एसएससीएल’च्या माध्यमातून सातारकरांना प्रतिभावंत खेळाडूंचा खेळ पाहण्याची संधी मिळाली. प्रत्येक सामन्यावेळी खेळाडूंच्या पाठीवार संघप्रेरक, मार्गदर्शक, शाळांचे मुख्याध्यापक तसेच पालकांनी थाप मारून कौतुक केले. या प्रोत्साहनातूनच त्यांचा भविष्याचा पाया भक्कम झाला. हीच संधी ‘सकाळ’ने पुन्हा एकदा ‘सातारा जिल्हा क्रिकेट असोसिएशन’च्या सहकार्याने ‘एसएससीएल’च्या रूपाने २८ फेब्रुवारीपासून उपलब्ध केली आहे. या स्पर्धेत सातारा शहरातील शाळांमधील ‘लिटल मास्टर’ संधीचे सोने करतीलच, आपणही त्यांना ‘चिअर्स’ करूया. 

संघप्रेरकांना अावाहन
या स्पर्धेसाठी संघप्रेरक म्हणून शाळांमधील माजी विद्यार्थी, व्यावसायिक, उद्योजक, मान्यवर यांनी शालेय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

इच्छुक  संघप्रेरकांनी 
राहुल पवार (९९२२९१३३४५), 
मेलवीन डिमेलो (९५५२५४८८१४), 
विजय जगताप (९८८१७३६०९६),
विजय सुतार (८३८००९२२११) 
यांच्याशी संपर्क साधावा, 
असे आवाहन करण्यात आले आहे.

स्पर्धा प्रारंभ ः २८ फेब्रुवारी २०१७
स्थळ ः छत्रपती शाहू जिल्हा 
 क्रीडा संकुल, सातारा
स्पर्धेचा तपशील ः वेळोवेळी  ‘सकाळ’मध्ये

Web Title: sakal cricket league satara