mokashi.
mokashi.

'सकाळ' मुळे मिळाली आमची आई!

कलेढोण - मायणी-बोपोशीतील बकुळाबाई राणोजी मोकाशी या आपल्या मुलगा यशवंतकडे मानखुर्दला राहत होत्या. आज सकाळी साडेसहा वाजता घराजवळूनच अचानक बेपत्ता होऊन वाशी रेल्वे पोलिस ठाण्यात पोहचल्या. ही माहिती वाशी पोलिसामार्फत सकाळ बातमीदारास समजल्यानंतर त्याने मित्रांच्या मदतीने गावाकडच्या कुटुंबाला माहिती कळवताच त्या सुखरूप घरी परतल्या. सकाळमुळे आमची आई परत मिळाल्याचे सांगत श्रीरंग, नामदेव, भरत, यशवंत, बाळू या पाच मुलांनी सकाळचे आभार मानले.

याबाबत अधिक माहिती, मायणीजवळ बोपोशी हे स्थलांतरीत गाव आहे. बकुळाबाईचा मोठा मुलगा श्रीरंग मायणीत तर नामदेव, भरत, यशवंत, बाळू ही चार मुले, मुलगी शारदा व बकुळाबाई या मुबईत राहतात. बकुळाबाई काही दिवसापूर्वी शारदासोबत मुंबईला आल्या. तिच्याकडे मुक्काम करून त्या मुलगा यशवंतकडे मुक्कामास गेल्या. सुरवातीलाच शहराकडे जाण्यास नाही म्हणणाऱ्या बकुळाबाई मुंबईच्या वातावरणात रमल्या नाहीत. आज सकाळी साडेसहा वाजता बकुळाबाई घराजवळ फेरफटका मारत असतानाच अचानक हरवल्या. त्या मानखुर्दची ट्रेन पकडून सानपाड्यात पोहचल्या. तिथे काही महिलांना बकुळाबाई चुकल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी रेल्वे महिला पोलिसांना कळविले. त्यानंतर बकुळाबाईना वाशी पोलिस मुख्यालयात पाठविण्यात आले. सारिका बोराटे या महिला पोलिसाने बकुळाबाईची चौकशी करत खटाव-माणमध्ये संपर्क केला. वयोवृद्ध व घाबरलेल्या बकुळाबाईना सुरवातीला आपले नाव नीट सांगता येत नव्हते. मात्र महिला पोलिस बोराटे यांनी प्रेमाने आपुलकीने गावाचे नाव विचारल्यानंतर आपले गाव खटाव-मायणीजवळ असल्याचे सांगितले. ही माहिती मोबाईलव्दारे राजापूरच्या महादेव घनवट यांनी खटावच्या प्रकाश मदने यांना सांगितली. त्यांनी ती मायणीजवळचे सकाळचे बातमीदार अंकुश चव्हाण यांना सांगितली. त्यांनी उपलब्ध माहितीच्या आधारे सुभाष माळी, किरण मिसाळ यांच्या मदतीने मायणीजवळच्या बोपोशीमधील बकुळाबाईंच्या घराचा शोध घेतला. ही माहिती मिळताच मोठा मुलगा यशवंत यांच्या डोळ्यात अश्रू तराळले. त्यांनी आपल्या मुंबईच्या यशवंतला लगेच संपर्क करून आई वाशीला असल्याचे सांगितले. 

सकाळपासून मुंबईत आईच्या शोधात असणाऱ्या श्रीरंग, नामदेव, भरत, यशवंत, बाळू व मुलगी शारदा यांच्या आनंदाला पारावरच उरला नाही. सकाळमुळेच आमची आई आम्हाला परत मिळाल, असे बोलताना यशवंतचे अंत:करण भरून आले. सात मुलाची आई असणाऱ्या बकुळाबाईना मुलांना पाहून उर भरून आला असल्याचे सारिका बोराटे यांनी सांगितले.  

गावावरून मोबाईलमुळे आई सापडल्याचे कळल्यावर जीव भांड्यात पडला. डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. 'सकाळ' मुळे व महिला पोलिस सारिका बोराटेमुळे आमची आई आम्हाला परत मिळाली. 
यशवंत मोकाशी - मानखुर्द -मुंबई 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com