वाढीव तलाठी सज्जांना अखेर मिळाली मंजुरी 

तात्या लांडगे
गुरुवार, 26 जुलै 2018

सोलापूर : पुणे विभागातील सोलापूर, सातारा व पुणे जिल्ह्यांमध्ये 139 वाढीव तलाठी सज्जांना तर 23 महसूल मंडळांना अखेर मंत्रिमंडळाच्या उपसमितीने 24 जुलै रोजी मंजुरी दिली आहे. याबाबत सकाळ मध्ये 21 जुलै रोजी बातमी प्रसिध्द करण्यात आली होती. 

सोलापूर : पुणे विभागातील सोलापूर, सातारा व पुणे जिल्ह्यांमध्ये 139 वाढीव तलाठी सज्जांना तर 23 महसूल मंडळांना अखेर मंत्रिमंडळाच्या उपसमितीने 24 जुलै रोजी मंजुरी दिली आहे. याबाबत सकाळ मध्ये 21 जुलै रोजी बातमी प्रसिध्द करण्यात आली होती. 

तलाठी सज्जा पुनर्रचना समितीने जिल्ह्यांमध्ये किती वाढीव तलाठी सज्जांची आणि महसूल मंडळांची गरज आहे. त्याबाबत संबंधित प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली अहवाल तयार करून तो जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला पाठविला. परंतु, त्यावर मागील वर्षभरापासून काहीच कार्यवाही होत नव्हती. आता मंत्रिमंडळाच्या उपसमितीच्या मंजुरीनुसार कोकण विभागातील मुंबई शहरात 19 तलाठी सज्जे तर चार महसूल मंडळे, सिंधुदूर्ग जिल्ह्यात 86 तलाठी सज्जे आणि 15 महसूल मंडळे व रायगड जिल्ह्यात 25 तलाठी सज्जे तर चार महसूल मंडळे नव्याने स्थापन होणार आहेत. तसेच पुणे विभागातील साताऱ्यात 32 सज्जे व पाच महसूल मंडळे आणि पुणे जिल्ह्यात आठ सज्जे व एक महसूल मंडळ वाढणार आहे. 

सोलापूर जिल्ह्याला खऱ्या अर्थाने वाढीव तलाठी सज्जांची व महसूल मंडळांची गरज होती. मंत्रिमंडळाच्या उपसमितीच्या मंजुरीनंतर जिल्ह्यात 99 तलाठी सज्जे आणि 17 महसूल मंडळांची नव्याने निर्मिती केली जाणार असून त्यामुळे खातेदारांचे प्रश्‍न मार्गी लागणार आहेत. 
- संजय तेली, निवासी उपजिल्हाधिकारी 

आकडे बोलतात... 
कोकण विभाग 
वाढीव तलाठी सज्जे - 130 
वाढीव महसूल मंडळे - 23 
पुणे विभाग 
वाढीव तलाठी सज्जे - 139 
वाढीव महसूल मंडळे - 23

Web Title: sakal impact get permission for talathi sajja