पाणी पितात वन्यप्राणी; धन्य होतो आम्ही

karkamb
karkamb

करकंब (ता. पंढरपूर) : येथील जंगलातील वन्यप्राण्यांचे चारा-पाण्यावाचून होणारे हाल 'सकाळ' मधून संपूर्ण राज्यात प्रसिद्ध झाल्यानंतर आता पुण्यातील काही वन्यप्रेमी नागरिकांसह समाजातील विविध स्तरातून या प्राण्यांच्या चारा-पाण्यासाठी आर्थिक मदतीचा ओघ सुरु झाला आहे. तहानेने व्याकूळ झालेले येथिल प्राणी टँकरने सोडलेले पाणी पिण्यासाठी पाणवठ्यावर धाव घेतात तेव्हा मदत करणाऱ्या प्राणीमित्रांकडून शब्द बाहेर पडतात, "पाणी पितात वन्यप्राणी आणि धन्य होतो आम्ही." याचवेळी येथिल वन्यप्राण्यांच्या चारा-पाण्यासाठी सकाळने घेतलेल्या पुढाकाराबद्दल ते 'सकाळ'लाही धन्यवाद देत आहेत. 

प्रथम 'दैनिक सकाळ'ने 14 मेला 'दुष्काळामुळे वन्यप्राण्याचे अस्तित्व धोक्यात' ही बातमी प्रसिद्ध केली होती. त्या बातमीने प्रभावित होवून पूणे येथिल निसर्गप्रेमी हृषिकेश कुलकर्णी, नेहा सिंग, रोहित गोडबोले, यश्विन राज आणि एस.आर.धनुष यांनी प्रत्यक्ष वनास भेट देवून येथिल विदारक चित्र पाहिले. त्यांनी स्वतः पुढाकार घेवून वन्यप्राण्याच्या चारा-पाण्यासाठी आर्थिक तरतूद करण्याच्या दृष्टीने नियोजन केले. त्यानुसार दर तीन दिवसातून एकदा मकेचा पाच गुंठे हिरवा चारा व पाण्याचा एक टँकर टाकण्याचे नियोजन करण्यात आले. याकामी वनविभागानेही मोलाचे सहकार्य केले. पण यासाठी आर्थिक तरतूद मोठ्या प्रमाणात होणे गरजेचे असल्याने निसर्गप्रेमी नागरिकांना मदत करण्याचे आवाहन करण्यात आले होते. तर काही जणांनी स्वतःहून पुढे येत वन्यप्राण्यांच्या चारा-पाण्यासाठी आर्थिक मदत देवू केली आहे. 

आतापर्यंत मदत केलेल्या वन्यप्रेमी नागरिकांमध्ये पुणे येथिल निसर्गप्रेमींनी चार वेळा साधारणपणे २२ गुंठे हिरवा मक्याचा चारा, बद्रीनाथ पार्थसारथी- पाच हजार रुपये, पोपट माने, नागनाथ भोसले, अशोक शेळके यांनी दोन ट्रेलर हिरवा चारा दिला असून पाण्याच्या टँकरसाठी मदत केलेले प्राणीप्रेमी या प्रमाणे- शौकत पटेल (बार्डी), एसबीआयच्या करकंब शाखेचे शाखाधिकारी विजय भागवत, केंद्रप्रमूख भानुदास शिंदे, डॉ. सुरेश व्यवहारे, प्राथमिक शिक्षिका संध्या काळे. 

मदतीचे आवाहन 
सध्याची भयानक दुष्काळी परिस्थिती आणि बार्डीच्या वनात शंभरहून अधिक असणाऱ्या वनगायी व हरणांची संख्या लक्षात घेता त्यांच्या चारा-पाण्यासाठी होणारा खर्च मोठा असल्याने प्राणीप्रेमी नागरिकांना आर्थिक मदत करण्याचे आवाहन पूणे येथिल निसर्गप्रेमी नागरिक हृषिकेश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले आहे. ज्यांना मदत करायची ईच्छा आहे त्यांनी 'सकाळ' प्रतिनिधी सूर्यकांत बनकर (८२७५२७५१९८) व हृषिकेश कुलकर्णी (९८९०९४३४५९) यांच्याशी संपर्क साधावा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com