चुकीच्या नियमांनी सर्वसामान्य उमेदवारांवर अन्याय 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 जानेवारी 2017

कोल्हापूर - महापालिकेत सुरू असलेल्या वर्ग 1 व वर्ग 2 नोकर भरती प्रक्रियेत सामाजिक व समांतर आरक्षणाबाबत कायदे व नियमावलीचा प्रशासनाकडून चुकीचा अर्थ लावल्याने सर्वसाधारण गटातील उमेदवारांवर अन्याय होत आहे. यामध्ये दुरुस्ती करावी, अशी मागणी सकल मराठा समाजाने निवेदनाद्वारे केली आहे. हे निवेदन आयुक्त पी. शिवशंकर यांना दिले. महापालिकेची प्रक्रिया एमपीएससीच्या नियमांची पायमल्ली करणारी आहे. म्हणून भरतीसाठी एमपीएससीच्या 25 सप्टेंबर 2014च्या पुनर्घोषणेची अंमलबजावणी करावी, अशी मागणी निवेदनात केली आहे. सर्वसाधारण उमेदवारांवर अन्याय झाला तर तीव्र आंदोलनाचा इशाराही दिला आहे.

कोल्हापूर - महापालिकेत सुरू असलेल्या वर्ग 1 व वर्ग 2 नोकर भरती प्रक्रियेत सामाजिक व समांतर आरक्षणाबाबत कायदे व नियमावलीचा प्रशासनाकडून चुकीचा अर्थ लावल्याने सर्वसाधारण गटातील उमेदवारांवर अन्याय होत आहे. यामध्ये दुरुस्ती करावी, अशी मागणी सकल मराठा समाजाने निवेदनाद्वारे केली आहे. हे निवेदन आयुक्त पी. शिवशंकर यांना दिले. महापालिकेची प्रक्रिया एमपीएससीच्या नियमांची पायमल्ली करणारी आहे. म्हणून भरतीसाठी एमपीएससीच्या 25 सप्टेंबर 2014च्या पुनर्घोषणेची अंमलबजावणी करावी, अशी मागणी निवेदनात केली आहे. सर्वसाधारण उमेदवारांवर अन्याय झाला तर तीव्र आंदोलनाचा इशाराही दिला आहे. याबाबत आयुक्तांनी कायदेशीर अभिप्राय घेऊन कार्यवाही करण्याचे आश्‍वासन दिले आहे. 

निवेदनात म्हटले आहे, महापालिकेच्या आस्थापनावरील गट अ व गट ब मधील निर्देशीत केलेल्या संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवा प्रवेशाने भरती करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पदांची शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, निवड पद्धती, सामाजिक व समांतर आरक्षण व इतर सर्वसाधारण अटी-सूचना यांची माहिती संकेतस्थळावर जाहीर केली होती. या पदासाठी लेखी परीक्षा घेतली आहे; पण त्याचा निकाल जाहीर केलेला नाही. यासंदर्भात बोलताना ऍड. बाबा इंदूलकर यांनी सर्वसाधारण गटातील उमेदवार, परीक्षार्थी यांच्यावर, सामाजिक व समांतर आरक्षणाबाबतचे कायदे व नियमावली यांचा प्रशासनाकडून चुकीचा अर्थ लावला जात आहे. परिणामी या गटातील उमेदवार, परीक्षार्थी यांच्यावर अन्याय होत आहे. ही बाब महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या निदर्शनास आल्यानंतर आयोगामार्फत 25 सप्टेंबर 2014 ला पुनर्घोषणा प्रसिद्ध केली आहे. शासकीय व निमशासकीय आस्थापनावर नोकर भरती करणारी संस्था म्हणून महाराष्ट्र लोकसेवा आयोग ओळखले जाते. याबाबत त्यांनी केलेले नियम हे महाराष्ट्रातील नोकर भरतीसाठी सर्वांनाच लागू असतात. त्यामुळे महापालिकेने एमपीएससीच्या पुनर्घोषणेचा उल्लेख करून अंमलबजावणी करावी, महापालिकेने जर याबाबतीत कारवाई केली नाही, तर मात्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला. 

सकल मराठा, क्षेत्रीय मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, मराठा मेडिको चेंबर ऑफ कॉमर्स, क्षेत्रीय मराठा इंजिनिअर्स चेंबर ऑफ कॉमर्स, मराठा महासंघ, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड, शिवाजी पेठ तालीम मंडळ, प्रजासत्ताक सामाजिक सेवा संस्था, प्रल्हाद चव्हाण, दीपक मगदूम, राजू लिंग्रस, कॉमन मॅन संघटना, बजरंग दल, हिंदू महासभा, हिंदू युवा यांचे प्रतिनिधी व प्रा. जयंत पाटील, दिलीप देसाई, अजित राऊत, वसंत मुळीक, डॉ. कोटकर, महेश उरसाल, बंडा साळुंखे, अशोक देसाई, माजी नगरसेवक उत्तम कोराणे, प्रकाश गवंडी, विनायक फाळके, सचिन पाटील, उमेश पोवार, किरण घुमे आदी उपस्थित होते.

Web Title: sakal marathwa samaj