"एसटी'तून केवळ दहा टनांचीच वाहतूक करा : शेखर चन्ने यांची सूचना

Sakal News Effect": Only 10 tons transported from ST bus
Sakal News Effect": Only 10 tons transported from ST bus

सांगली : एसटीच्या मालवाहतूक गाड्यातून केवळ दहा टनांची वाहतूक करावी. जादा मालाची वाहतूक होणार नाही याची मालवाहतूक गाडीवरील चालकाने दक्षता घ्यावी, अशा सूचना आज एसटी चे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी "व्हीडिओ कॉन्फरन्स' द्वारे सर्व विभागांना दिल्या. तसेच मालवाहतुकीसंदर्भात लवकरच नवीन परिपत्रक काढले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. "सकाळ' ने मालवाहतुकीमध्ये होत असलेल्या घोटाळ्यावर प्रकाशझोत टाकल्यानंतर आज त्यावर चर्चा झाली. 

एसटीने मालवाहतुकीसाठी दहा टनांची मर्यादा निश्‍चित केली आहे. परंतु अनेक आगारांतून मालवाहतुकीसाठी सोडलेल्या गाड्यांमध्ये प्रत्यक्षात दहा टनांपेक्षा जादा माल भरला जातो. एसटी आगाराला दहा टनांची पावती दिली जाते. तर ज्याला माल पाठवायचा असतो, त्याला मात्र अकरा ते बारा टनांपर्यंत जेवढा माल असेल त्याची पावती दिली जाते.

काही ठिकाणी एसटीच्या चालकांना ही चलाखी लक्षात आली. त्यांनी जादा माल नेण्यास नकार दिल्यानंतर पुरवठादार संबंधित आगारात तक्रार करतो. तेव्हा तेथून चालकाला पुढच्या खेपेला बघू असे म्हणून सांगितले जाते. उत्पन्न वाढीच्या उद्देशामुळे या जादा वाहतुकीकडे राजरोस दुर्लक्ष केले जात आहे. प्रत्यक्षात यामध्ये एसटीचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. शिवाय चालकांना होणारा त्रास आणि संभाव्य कारवाईची टांगती तलवार हा विषय वेगळाच आहे. 

"सकाळ' ने मालवाहतुकीत होत असलेल्या घोटाळ्यावर प्रकाशझोत टाकला. त्याची दखल घेण्यात आली. आज झालेल्या "व्हीडीओ कॉन्फरन्स' मध्ये व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी सर्व विभागांतील मालवाहतुकीचा आढावा घेतला. त्यावेळी दहा टनांपेक्षा जादा वाहतूक होणार नाही, यासाठी चालकांना दक्ष ठेवावे अशा सूचना दिल्या. चालकांनी जादा वाहतुकीस नकार द्यावा. तसेच एसटीचा जादा वाहतुकीमुळे तोटा होणार नाही, यासाठी लवकरच परिपत्रक काढले जाईल असे स्पष्ट केले. 

चालकांकडून कौतुक
मालवाहतूक करणाऱ्या एसटी चालकांना अनेक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. जादा टनांबरोबर कारवाईची टांगती तलवार घेऊन फिरावे लागत आहे. "सकाळ' ने याची वाचा फोडल्याबद्दल आज अनेकांनी कौतुक केले. 

संपादन : युवराज यादव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com