उद्यापासून पॉलिटेक्‍निक प्रवेश प्रक्रिया 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 जून 2017

सामाईक प्रवेशपूर्व परीक्षा कक्षामार्फत तंत्रनिकेतन (पॉलिटेक्‍निक) प्रथम वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. सोमवारपासून (ता.19) ही प्रवेश प्रक्रिया सुरु होत आहे. यंदाही प्रवेशाच्या तीन फेऱ्या होणार असून विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने 30 जून अखेर अर्ज करण्याची मुदत आहे.

गडहिंग्लज : सामाईक प्रवेशपूर्व परीक्षा कक्षामार्फत तंत्रनिकेतन (पॉलिटेक्‍निक) प्रथम वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. सोमवारपासून (ता.19) ही प्रवेश प्रक्रिया सुरु होत आहे. यंदाही प्रवेशाच्या तीन फेऱ्या होणार असून विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने 30 जून अखेर अर्ज करण्याची मुदत आहे. 5 जुलैला पक्की गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. शासकीय आणि अनुदानित पॉलिटेक्‍निकमधील रिक्त जागांसाठी स्वतंत्र चौथी फेरी होणार आहे. 

दहावीचा मंगळवारी (ता.13) ऑनलाईन निकाल जाहीर झाला. त्यामुळे विद्यार्थ्यांना पॉलिटेक्‍निक प्रवेशाचे वेध लागले होते. याबाबत प्रवेशाचे सविस्तर वेळापत्रक संचालनालयाने आज संकेतस्थळावर जाहीर केले. खुल्या गटासाठी 400 तर मागासवर्गीयांसाठी 300 रुपये प्रवेश अर्जाची किंमत आहे. प्रवेश अर्जाद्वारे मिळणाऱ्या सांकेतिक क्रमांकाच्या मदतीने विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने www.dtemaharashtra.gov.in/poly2017 या संकेतस्थळावर अर्ज सादर करावा लागणार आहे. 30 जून अखेर अर्ज करण्याची मुदत आहे. याच कालावधीत विद्यार्थ्यांना आपली मूळ गुणपत्रके दाखले यांची अर्ज स्वीकृती केंद्रात जावून छाननी करुन घ्यावी लागणार आहे. 1 जुलैला कच्ची गुणवत्ता यादी जाहीर होईल. या यादीवर आक्षेप घेण्यासाठी 4 जुलैअखेर मुदत आहे. 5 जुलैला पक्की गुणवत्ता यादी जाहीर होईल. 6 जुलैला पहिल्या फेरीसाठी आरक्षणानुसार उपलब्ध असणाऱ्या जागांचा तपशील संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे. 

7 ते 11 जुलै अखेर विद्यार्थ्यांना विविध संस्था आणि अभ्यासक्रमाचे विकल्प भरण्याची मुदत आहे. 13 जुलैला प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांची पहिली यादी जाहीर होणार आहे. या विद्यार्थ्यांनी 17 जुलै अखेर आपापल्या संस्थेत हजेरी देवून प्रवेश निश्‍चित करावयाचा आहे. 19 जुलैला दुसऱ्या फेरीसाठी उपलब्ध असणाऱ्या जागांचा तपशील जाहीर होईल. 20 ते 23 जुलै अखेर विद्यार्थ्यांना दुसऱ्या फेरीसाठी विकल्प दुरुस्त करण्याची संधी आहे. 24 जुलैला दुसरी यादी जाहीर होईल. 27 जुलै अखेर या विद्यार्थ्यांना संबंधित संस्थेत प्रवेश निश्‍चित करावयाचा आहे. 29 जुलैला तिसऱ्या फेरीसाठी जागांचा तपशील जाहीर होईल. 1 ऑगस्ट अखेर तिसऱ्या फेरीसाठी विकल्प बदलण्याची संधी आहे. 3 ऑगस्टला पक्की गुणवत्ता यादी जाहीर होईल. या यादीतील विद्यार्थ्यांना 6 ऑगस्ट अखेर प्रवेश मिळालेल्या संस्थेत हजर व्हावे लागणार आहे.14 ऑगस्टला प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांची नावे जाहीर होतील. दहा ऑगस्टपासून पॉलिटेक्‍निक प्रथम वर्षाच्या शैक्षणिक कामकाजाला प्रारंभ होणार आहे. 

Web Title: sakal news polytechnic admission news

टॅग्स