शिवराज्याभिषेक सोहळा राष्ट्रीय सण व्हावा यासाठी प्रयत्न - संभाजीराजे छत्रपती

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 जून 2017

शिवराज्याभिषेक सोहळा हा संपूर्ण जनतेचा असून तो राष्ट्रीय सण म्हणून साजरा व्हावा यासाठी आपण प्रयत्न करत आहोत असे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले.

कोल्हापूर- यावर्षी 6 जूनला शिवराज्याभिषेक सोहळ्याला 344 वर्षे पूर्ण होत आहे. गेल्या काही वर्षांपासून भव्यदिव्य असा हा सोहळा रायगडावर साजरा होत आहे. याबाबत बोलताना खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले की, शिवराज्याभिषेक सोहळा हा संपूर्ण जनतेचा असून तो राष्ट्रीय सण म्हणून साजरा व्हावा यासाठी आपण प्रयत्न करत आहोत तसेच यावर्षीच्या राज्याभिषेक सोहळ्यात 'संवर्धन रायगडाचे, मत शिवभक्ताचे' हा दोन तासाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. ज्यामध्ये रायगड कसा असावा? याबाबत शिवभक्तांकडून सूचना मागवण्यात येणार आहेत.

Web Title: sakal news Raigad news Sambhajiraje Chhatrapati news

टॅग्स