‘एनआयई’चा पहिला अंक वितरित

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 जुलै 2018

कोल्हापूर - ‘सकाळ माध्यम समूहा’च्या न्यूजपेपर इन एज्युकेशन (सकाळ एनआयई) या विद्यार्थिप्रिय उपक्रमाची शाळानिहाय सभासद नावनोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शहरातील चार शाळांत आज पहिल्या अंकाचे वितरण झाले. उषाराजे गर्ल्स हायस्कूल, नागोजीराव पाटणकर हायस्कूल, श्रीराम विद्यालय आणि आदर्श प्रशालेत या अंकाचे जोरदार स्वागत झाले. 

दरम्यान, या शाळांसह वि. स. खांडेकर प्रशाला, कळंबा गर्ल्स हायस्कूल, नूतन मराठी विद्यालय, महाराष्ट्र हायस्कूल, इंदुमती देवी गर्ल्स हायस्कूल, शां. कृ. पंत वालावलकर हायस्कूल, संकल्प हायस्कूल, पद्माराजे गर्ल्स हायस्कूल या शाळांचा उपक्रमात समावेश आहे. 

पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या या उपक्रमासाठी २०१८-१९ या शैक्षणिक वर्षासाठी १५० रुपये शुल्क आहे. मराठी शाळांत असा उपक्रम करणारे ‘सकाळ’ हे महाराष्ट्रातील एकमेव दैनिक आहे. राज्यभरातील सुमारे पाचशेहून अधिक शाळांमधील विद्यार्थी या उपक्रमाचा लाभ घेत आहेत. ‘सकाळ एनआयई’तर्फे वर्षभरात कला कौशल्य, व्यक्तिमत्त्व विकास अशा विषयांवर शाळानिहाय कार्यशाळा तसेच ग्रेड परीक्षा मार्गदर्शन, इको गणेशा, आंतरशालेय नाट्य स्पर्धा, निबंध स्पर्धा अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. याचबरोबर शैक्षणिक वर्षात ‘सकाळ एनआयई’चे १८ अंक सभासदांना मिळतील. यामध्ये अनेकविध लेख, गंमतकोडी यांचा समावेश असेल. तसेच विद्यार्थ्यांना शालोपयोगी भेटवस्तू देण्यात येईल. आपल्या शाळेतील अधिकाधिक विद्यार्थ्यांचा सहभाग या उपक्रमात होण्यासाठी मुख्याध्यापकांनी सहकार्य करावे, असे आवाहन ‘सकाळ एनआयई’तर्फे केले आहे. 

‘सकाळ एनआयई’च्या सभासद नावनोंदणीसाठी व अधिक माहितीसाठी सकाळी ११ ते ५ या कालावधीत संपर्क साधावा. 
- संपर्क ः सुशांत पाटोळे (८८८८१६६११४) 

‘एनआयई’ चे उपक्रम
शैक्षणिक वर्षात सकाळ एनआयईचे - १८ पाक्षिक अंक
शैक्षणिक भेटवस्तू 
पहिल्या ५०० विद्यार्थ्यांना १०० रुपयांचे ‘सकाळ’ पुस्तक प्रकाशनाचे व्हाैचर

Web Title: sakal nie first edition distribution