राख्या विकून विद्यार्थिनींची ‘सकाळ रिलीफ फंडा’ला मदत

Rakhi-Sailing
Rakhi-Sailing

सांगली - प्रलयंकारी महापुराने उद्‌ध्वस्त झालेल्या केरळमधील जनतेच्या मदतीसाठी आज ‘सकाळ रिलीफ फंडा’कडे विद्यार्थिनींनी दिलेली मदत अनमोल ठरली. येथील राणी सरस्वतीदेवी कन्या शाळेच्या विद्यार्थिनींनी स्वतः राख्या बनवून, विकून त्यांतून ही मदत उभी केली आहे. रक्षाबंधनाला एरवी भाऊ बहिणीला ओवाळणी देतो, इथे दूरदेशी केरळमध्ये संघर्ष करणाऱ्या भावांसाठी बहिणींनी मदतीचा हात पुढे केला. 

या शाळेत इंटरॅक्‍ट क्‍लब नावाची संकल्पना राबवली जातेय. त्या माध्यमातून हा उपक्रम हाती घेण्यात आला असल्याचे संयोजक गोविंद धुमाळ यांनी सांगितले. मुलींनी घरातून थोडे पैसे घेतले आणि त्यातून लोकरी धागे, मणी आदी साहित्य खरेदी करून राख्या बनवल्या.

शाळेत स्टॉल लावले. तेथील विद्यार्थिनींनी आपल्या भावासाठी या मुलींकडूनच राख्या खरेदी केल्या. त्यातून जमलेली सर्व रक्कम केरळमधील पूरग्रस्तांच्या निधीसाठी ‘सकाळ रिलीफ फंडा’कडे जमा करण्यात आली. क्‍लबच्या अध्यक्षा भाग्यश्री चित्रुक, कार्यवाह प्रियांका देखणे आणि नववीतील सर्व विद्यार्थिनी यासाठी राबल्या. ही रक्कम सुपूर्द करताना विद्यार्थिनी भारावल्या होत्या. संकटातील आपल्या भावांसाठी काहीतरी करतोय, याचे समाधान त्या अनुभवत होत्या. राष्ट्रीय हरित सेना सदस्य आशिषकुमार यमगर, मुख्याध्यापक सुनीता माने, उपमुख्याध्यापक धनश्री करमरकर, पर्यवेक्षक सुनीता गाडगीळ यांनी उपक्रमासाठी मार्गदर्शन केले. 
‘सकाळ’चे सहयोगी संपादक शेखर जोशी यांच्याकडे मदतीचा धनादेश देण्यात आला.

आज मदत दिलेले 
अथर्व आनंदराव चरापले (कौलव, ता. राधानगरी)- ३०२, पूनम बाळासो पाटील (कसबा ठाणे, ता. पन्हाळा)- १५००, प्रभाकर स. काटे (कोल्हापूर)-१००१, ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ शिवराम बाबूराव भोजे (कोल्हापूर)-१०,०००, एक देणगीदार (कोल्हापूर, नाव प्रसिद्ध करू नये, अशी विनंती असणारा)-२०००, जयश्री ट्रेडिंग कॉर्पोरेशन (कोल्हापूर), १००१, सुभाष धुमे सेवा प्रतिष्ठान (गडहिंग्लज)- १०,०००, रवींद्र चुंबळकर (भिलवडी, जि. सांगली)-१०००, सुकुमार दादा अकोळे (सांगली)-१०००, मा. मुख्याध्यापिका, राणी सरस्वतीदेवी कन्याशाळा (सांगली)-५०००, अजितकुमार बाबासो पाटील (वसगडे, ता. पलूस, जि. सांगली)-११००, डॉ. संतोष शिंगोटे (पुणे)- २००१. (आजअखेर- दोन लाख ५२ हजार ५४९).

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com