वर्धापनदिनी रंगला "ऊर्जा' दायी व्यक्तिमत्वाचा सोहळा (व्हिडिओ)

Sakal Sangli Office Anniversary
Sakal Sangli Office Anniversary

सांगली - "सकाळ' सांगली विभागीय कार्यालयाच्या वर्धापनदिनी जिल्ह्यातील "ऊर्जा'दायी व्यक्तीमत्वांचा गौरव सोहळा विष्णुदास भावे नाट्यमंदिरात उत्साहात झाला.

अभिनेते प्रवीण तरडे, महापौर संगीता खोत यांच्याहस्ते आईला पुनर्जन्म देणारा अरमान मुल्ला, सांगलीचा स्वच्छतादूत राकेश दड्डणावर, गरिबीशी झुंजत "सीएस' उत्तीर्ण होणारी निशिगंधा मोरे, साहित्याची शिखरे सर करणारा सचिन पाटील, व्ही.स्टार ग्रुपच्या पूनम चव्हाण यांचा मानपत्र, शाल, रोपटे देऊन सन्मानित केले. तसेच मिरजेतील सुशिलाबाई घोडावत अंधशाळेलाही सन्मानित करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक गोरख कुचेकर, नॅबचे सचिव सतीश पाठारे आणि अंध विद्यार्थी यांनी व्यासपीठावर येऊन हा सन्मान स्विकारला. "सकाळ'चे संपादक संचालक श्रीराम पवार, निवासी संपादक डॉ. श्रीरंग गायकवाड, सहयोगी संपादक शेखर जोशी यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. 

व्यासपीठावरील मान्यवरांच्या सत्कार सोहळ्यास शेकडो प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट करून दाद दिली. अभिनेते प्रवीण तरडे यांनीही या "ऊर्जा' दायी व्यक्तीमत्वांचा भाषणातून उल्लेख करत "सकाळ' च्या अनोख्या उपक्रमाचे कौतुक केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com