‘सकाळ शॉपिंग फेस्ट’ची सोमवारी सोडत

Sakal-Shopping-Fest
Sakal-Shopping-Fest

सातारा - दै. ‘सकाळ’च्या वतीने १२ सप्टेंबर ते २५ नोव्हेंबर या कालावधीत घेण्यात आलेल्या ‘सकाळ शॉपिंग फेस्ट’मधील बंपर व मेगा बंपर बक्षिसांची सोडत येथील शाहू कलामंदिरात सोमवारी (ता. २८) सायंकाळी चार वाजता होणार आहे. विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या हस्ते या सोडती काढण्यात येणार आहेत. याचवेळी मधुरांगण सभासदांसाठी व कूपनधारकांसाठी प्रसिद्ध ज्योतिषतज्ज्ञ विश्‍वास पटवर्धन यांचा धमाल विनोदी कार्यक्रम स्वभाव राशीचे आयोजित केला आहे.

मेगा बंपर बक्षीस : ह्युंदाई इऑन मॅग्ना + १ लि. (व्हाईट)-१ बक्षीस, पहिले बक्षीस - सुझुकी एन ॲक्‍सेस डिस्क - १ बक्षीस, दुसरे बक्षीस - होंडा क्‍लिक - १ बक्षीस, तिसरे बक्षीस - हिरो एचएफ डिलक्‍स एसएस- १ बक्षीस, चौथे बक्षीस - प्लॅटिना १०० ईएस -१ बक्षीस , पाचवे बक्षीस - दीड तोळे सोने - १ बक्षीस, सहावे बक्षीस - रेकॉल्ड सोलर वॉटर हिटिंग सिस्टीम प्रो. - १ बक्षीस, सातवे बक्षीस - अकाई एलइडी टीव्ही (३२ इंची)- १ बक्षीस, आठवे बक्षीस - जी-केम आटाचक्की १ एचपी - १ बक्षीस, नववे बक्षीस -  जी-केम आर. ओ. प्युरिफायर -१ बक्षीस, दहावे बक्षीस - अकाई सेमी ऑटो वॉशिंग मशिन (८.२ कि. ग्रॅ.) -१ बक्षीस, अकरावे बक्षीस - हिरो स्ट्रीट रेंजर सायकल -२ बक्षिसे, बारावे बक्षीस - नक्षत्र मिक्‍सर ग्राइंडर - १ बक्षीस, तेरावे बक्षीस - सूर्या गॅस शेगडी -२ बक्षिसे, चौदावे बक्षीस - प्रेस्टीज पॉप्युलर कुकर (३ लिटर) -२ बक्षिसे), पंधरावे बक्षीस - गोल्ड नोज रिंग (नथ)- १०० बक्षिसे, सोळावे बक्षीस - १० ग्रॅम चांदीचे नाणे - ६४ बक्षिसे. 

या महोत्सवात सहभागी झालेल्या अनेक नागरिकांना स्क्रॅच कूपनवर बक्षिसे मिळाली आहेत. त्याबरोबरच त्यांना मुख्य सोडतीद्वारे मिळणाऱ्या बक्षीस योजनेचाही लाभ मिळणार आहे. या कार्यक्रमासाठी भेट कूपनधारक, सहभागी व्यावसायिक, निमंत्रित, तसेच वाचकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. 

या कार्यक्रमाचे प्रायोजक विद्यार्थ्यांमध्ये गणित अंक गणित याचे सोपं तंत्र विकसित करणारे सक्‍सेस ॲबॅकस ॲण्ड एज्युकेशन इंडिया साताराचे किरण पाटील, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे जगदंब ग्रिनस्टार फाउंडेशन आणि बक्षीस आणि संक्रांत वाण प्रायोजक दर्शन सारीज्‌ आणि वुमन्स एक्‍सक्‍युझिव्ह, तसेच बक्षिसाचे प्रायोजक लिराज ब्यूटी केअर अँड स्पा आहेत. सभासद व कुटुंबीयांना दर्शन स्वस्त आठवडा योजनेचा लाभ या निमित्ताने होणार आहे.

सभासद होऊन लुटा आनंदाचं वाण
  मधुरांगण सभासदांसाठी संक्रांतीच्या पार्श्‍वभूमीवर एकाच ठिकाणी अनेक उपक्रमांची पर्वणी : ४ वाजता ज्योतिषतज्ज्ञ विश्‍वास पटवर्धन यांचा धमाल विनोदी कार्यक्रम : स्वभाव राशीचे
दुपारी तीन वाजता : महिलांसाठी ब्लॅक मॅचिंग स्पर्धा व संक्रांत समारंभ स्पर्धेतील दोन विजेत्यांना बक्षीस रूपात डिझायनर साडी देण्यात येणार आहे.
  मधुरांगण सदस्य होण्याची संधी कार्यक्रमस्थळी उपलब्ध होणार आहे. वार्षिक सभासद शुल्क ४०० रुपये असून, सोबत एक फोटो आणि ८५० रुपयांचा डिनर सेट हे गिफ्ट मिळण्यासाठी कापडी पिशवी सोबत आणावी. 
  मधुरांगण लकी ड्रॉ याचवेळी होणार असून, लकी ड्रॉ कूपन कार्यक्रमस्थळी उपलब्ध.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com