सकाळ शॉपिंग फेस्टिव्हलची उत्सुकता शिगेला 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 डिसेंबर 2016

कोल्हापूर - बदलत्या जगाचा बदलता वेध घेत चोखंदळ कोल्हापूरकरांच्या खरेदी उत्सवासाठी अशाच अनेक नावीन्यपूर्ण व्हरायटींचा नजराणा घेऊन आता सकाळ शॉपिंग फेस्टिव्हल भेटीस येणार आहे. आठ डिसेंबरपासून या प्रदर्शनाला प्रारंभ होणार आहे. यासाठी सासने मैदानावर फेस्टिव्हलच्या तयारीस प्रारंभ झाला आहे. एकाच छताखाली येथे सर्व प्रकारची खरेदी करता येईल. 12 डिसेंबरपर्यंत रंगणाऱ्या प्रदर्शनाची उत्सुकता शिगेला पोचली असून फर्निचर क्षेत्रातील प्रसिद्ध "हायटेक फर्निचर' मुख्य प्रायोजक आहेत. 

कोल्हापूर हे वैविध्यपूर्ण शहर आहे. जुन्या व नव्या परंपरांचा संगम येथे पाहायला मिळतो. आधुनिक स्टाइलची क्रेझ करण्यात तरुणाई नेहमीच आग्रही असते. टीव्ही, टेपरेकॉर्डर, मोबाइल, मोबाइल ऍक्‍सेसरीज, एमपी थ्री-डीव्हीडी प्लेअर्स, फ्रीज, मायक्रोवेव्ह, टू व्हीलर, फोर व्हीलर, किचन ट्रॉली, क्रॉकरी, कॉस्मेटिक्‍स, कर्टन्स, फर्निशिंग, इम्पोर्टेड शूज, आटा चक्की, मसाले, सोलर्स, शूज रॅक, कपडे, ज्वेलरी, किचन चिमणीज, गॅस शेगडी, आयुर्वेदिक प्रॉडक्‍टस्‌, फर्निचर, मातीची भांडी, सीसीटीव्ही कॅमेरे, वॉटर प्युरिफायर, मिल्क प्रॉडक्‍टस्‌, लेडीज ऍक्‍सेसरीज, पेस्ट कंट्रोल, बुक्‍स, झुला, वेडिंग मॅनेजमेंट अशा विविध स्टॉल्ससह खवय्यांसाठी पर्वणी ठरणारी खाद्यसंस्कृती आणि बालमित्रांसाठी ऍम्युझमेंट पार्क येथे अवतरणार आहे. 

प्रदर्शनासाठीच्या अधिक माहितीसाठी संपर्क - सूरज जमादार (9922551918), संतोष पाटील (9975513951). 

"हायटेक'तर्फे आकर्षक ऑफर 
नागाळा पार्क कमानीजवळ नवरंग रिजन्सी येथे हायटेक फर्निचरचे तीन हजार चौरस फुटांचे प्रशस्त शोरूम आहे. प्रदर्शनात हायटेक फर्निचरचे सर्व प्रकारचे फर्निचर उपलब्ध असेल. माफक दरात अत्युच्च दर्जाचे इम्पोर्टेड वूड बेस्ड बोर्ड, दर्जेदार हार्डवेअर, मजबूत फिटिंग्ज वापरून अत्याधुनिक मशिन्सवर बनविण्यात येते. अत्याधुनिक टेक्‍श्चर, नवीन कलर्स, डिझाइनचे विविध प्रकारचे बेड, वॉर्डरोब्ज, टीव्ही, एलसीडी युनिट, शोकेस, दिवाण कम बेड, सोफा आदी घरगुती, व्यावसायिक फर्निचर येथे उपलब्ध असेल. आर्किटेक्‍टस्‌च्या मागणी, गरजेनुसार कंपनीमेड फर्निचर बनवून देण्याची सोयही आहे. सर्व फर्निचर शंभर टक्के वाळवी प्रतिबंधक आहे. कुठेही उपलब्ध नसणाऱ्या फर्निचरच्या शेडस्‌ हे "हायटेक'चे वैशिष्ट्य आहे. ड्युरोफ्लेक्‍स कंपनीचे कोल्हापुरातील हे एकमेव एक्‍सक्‍लुझिव्ह स्टोअर आहे. "ड्युरोफ्लेक्‍स' ही भारतातील मॅट्रिसेस क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी असून गाद्या-उशांची चार हजारांपासून ते 90 हजारांपर्यंत रेंज उपलब्ध आहे. क्वायर, फोम व स्प्रिंग प्रकारात गाद्यांची असंख्य व्हरायटी आहेत. प्रदर्शनात खरेदी करणाऱ्यांना "हायटेक फर्निचर'तर्फे आकर्षक डिस्काऊंट आणि भेटवस्तू देण्यात येतील. 

Web Title: sakal shopping festival