सकाळ शॉपिंग फेस्टिव्हलला ग्राहकांचा उदंड प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 डिसेंबर 2016

कोल्हापूर - छोट्या जागेतही आरामशीर बसता येईल, असे आरामदायी डिसेंट फर्निचर, घरगुती वापरासाठी सौरऊर्जा उपकरणांपासून ते चटणी मसाल्यापर्यंत नियमित वापरता येथील अशा घरगुती वापराच्या उंची वस्तूच्या प्रदर्शनाला सलग दुसऱ्या दिवशी ग्राहकांचा उदंड प्रतिसाद लाभत आहे. 

येथील सकाळ माध्यम समूहातर्फे आयोजित शॉपिंग फेस्टिव्हल येथील सासने मैदानावर भरले आहे. यात ‘कुटुंबासाठी सर्व काही’ अशी संकल्पना साकारली आहे. शॉपिंग फेस्टिव्हलमधील ८० हून अधिक दालनांत नावीन्यपूर्ण घरगुती वस्तूंची रेलचेल आहे. 

अगदी छोटा फ्लॅट असो वा पारंपरिक स्वरूपाचे घर असो, त्याला साजेशा तितक्‍याच गरजेच्या वस्तूंची खरेदी गृहिणींसाठी पर्वणीच ठरली आहे.

स्वयंपाकघरात कमी वेळेत जास्त भाजीपाला कटिंग मशीन, आटा चक्की, वॉटर प्युरिफायर, किचन ट्रॉली अशा मशीन तसेच गृहिणींना मदतनीस म्हणून उपयुक्त ठरतात. त्या आधारे घरात कमी वेळेत रुचकर व खमंग स्वयंपाक बनविण्यासाठी वेळेची बचत होते. शुद्धता लाभते. त्यासाठी या वस्तूंची गृहिणींना मोठी मदत होते. त्यामुळे अशा साधनांच्या खरेदीला महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाला. यात भाजी कटिंग मशीन, मसाला मिक्‍सिंग मशीन तसेच भाजणीसाठी गॅसवर ठेवाव्या लागणाऱ्या जाळ्या यांची खरेदी झाली, तर चिकन उकडण्यापासून वांग्याचे भरीत बनविण्यापर्यंतच्या लागणाऱ्या विविध तंत्रसाधनांची प्रात्यक्षिकेही बघण्यासाठी महिलांची गर्दी होती. 

घरात काही वस्तू, कपडे गच्चीवर ठेवावे लागतात, त्यासाठी शिडीचा वापर करावा लागतो अशा फोल्डिंगच्या शिड्या आहेत. तसेच ज्यांचे कमी आकाराचे किचन किंवा हॉल आहे तिथे ॲल्युमिनियमच्या तसेच लाकडी टेबल, खुर्ची, टी पॉय, कोच, लहान बेड, मोठा बेड असे साहित्य अनेकांसाठी लक्षवेधी ठरले आहे. असाच प्रकार सौंदर्य प्रसाधनाच्या दालनात आहे.

प्रत्येक घरात विवाह सोहळा आनंददायी तितकाच प्रसन्न सुंदर होतो त्याच्या स्मरण छटा दर्शविणाऱ्या अल्बमपासून येथे नख पॉलिश करण्यापर्यंत मेंहदी काढण्यापासून मेक-अप करण्यापर्यंतचे कलात्मक प्रकार आहेत. यात पारंपरिक, देशी-विदेशी निक्षीकामाची साधणे इच्छुक वधू-वरांना नव्या फॅशनची शैली दाखवून देत आहेत.

येथील कपड्यांच्या दालनात रंगबिरंगी बॉइश लुक असलेल्या कपड्यांना मागणी होती, तर महिलांसाठी खास सलवारी खमीज साडीपासून ते राजस्थानी गुजराती अशा विविध प्रांतीय फॅशनेबल कपडे खरेदीला येथे पसंती आहे.  

याशिवाय विविध प्रकारच्या दुचाकी, चार चाकी गाड्या, इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तू, मोबाइल ॲक्‍सेसीरिज, इर्म्पोटेड शूज, मातीची भांडी, आयुर्वेदिक उत्पादने, सीसीटीव्ही कॅमेरे आदी वस्तूही दालनात आहेत. 

ऑनलाईनची सुविधा
नोटांच्या तुटवड्यामुळे आर्थिक खरेदी व्यवहारात अडचण होऊ नये, यासाठी येथील दालानात पेटीएम सुविधा आहे. त्याद्वारे खरेदी केल्यास एका बारकोडिंगद्वारे तुमच्या खात्यातील पैसे संबंधित स्टॉलधारकांना मिळतात. येत्या सोमवारी रात्री साडेआठपर्यंत प्रदर्शन खुले राहणार आहे.

Web Title: sakal shopping festival