‘सकाळ शॉपिंग’ची दिमाखदार सांगता

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 डिसेंबर 2016

कोल्हापूर - एकाच छताखाली सर्व प्रकारची खरेदी आणि खरेदीसाठी उपलब्ध असलेली कॅशलेस सुविधा यामुळे सकाळ शॉपिंग फेस्टिव्हलला शेवटच्या दिवशीही कोल्हापूरकरांनी तुडुंब गर्दी केली. गर्दीच्या साक्षीनेच प्रदर्शनाची आज दिमाखदार सांगता झाली. या निमित्ताने सासने मैदानाने जणू खरेदीची जत्राच अनुभवली. 

दरम्यान, नेटके संयोजन आणि कॅशलेस सुविधेबाबत ग्राहकांतून समाधान व्यक्त झाले. त्याशिवाय अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोचण्याची पर्वणी प्रदर्शनात सहभागी सर्व स्टॉलधारकांना सलग पाच दिवस साधता आली. 

‘सर्वांसाठी सर्व काही’ खरेदीची पर्वणी असणाऱ्या या प्रदर्शनाचे फर्निचर क्षेत्रातील प्रसिद्ध ‘हायटेक फर्निचर’ मुख्य प्रायोजक होते. नागाळा पार्क कमानीजवळ नवरंग रिजन्सी येथे हायटेक फर्निचरचे तीन हजार चौरस फुटांचे प्रशस्त शोरूम आहे. प्रदर्शनात हायटेक फर्निचरने सर्व प्रकारचे फर्निचर उपलब्ध केले. त्यालाही ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. अत्याधुनिक टेक्‍श्चर, नवीन कलर्स, डिझाइनचे विविध प्रकारचे बेड, वॉर्ड रोब्ज, टीव्ही, एलसीडी युनिट, शोकेस, दिवाण कम बेड, सोफा आदी घरगुती व व्यावसायिक फर्निचर आता ग्राहकांसाठी शोरूममध्येही उपलब्ध असेल. त्याशिवाय आर्किटेक्‍टस्‌च्या मागणी व गरजेनुसार कंपनीमेड फर्निचर बनवून देण्याची सोयही येथे आहे. सर्व फर्निचर शंभर टक्के वाळवी प्रतिबंधक आहे. क्वायर, फोम व स्प्रिंग या प्रकारांत गाद्यांची असंख्य व्हरायटी येथे आहे. अधिक माहितीसाठी शोरूमशी संपर्क साधावा, असे आवाहन ‘हायटेक’तर्फे करण्यात आले.

Web Title: sakal shopping festival