सकाळ शॉपिंग फेस्टिव्हलचा खजिना उद्यापासून खुला

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 जानेवारी 2017

सांगली - येथील विलिंग्डन कॉलेजच्या कॅंपसमध्ये भव्य शामियाना थाटण्यात आला आहे. इथं होम अप्लायन्सेसह दुचाकी आणि चारचाकी वाहने पाहण्यासाठी मिळणार आहे. मग काय मज्जाच... तर चला ‘सकाळ शॉपिंग फेस्टिव्हल’चा खजिना खुला होत आहे. गुरुवारी (ता.१९) प्रदर्शनाचे उद्‌घाटन होणार असून शॉपिंगची लयलूट करता येणार आहे. 

‘सकाळ माध्यम समूहा’च्या शॉपिंग फेस्टिव्हलची सांगलीकरांमध्ये न्यारी क्रेझ आहे. गेल्या काही वर्षांत उत्स्फूर्त प्रतिसादाने फेस्टिव्हलची रंगत द्विगुणित झाली आहे. यंदा १९ ते २३ जानेवारी दरम्यान विलिंग्डन कॉलेजच्या कॅंपसमध्ये फेस्टिव्हल होत आहे. ऑटो व शॉपिंग या क्षेत्रातील उत्पादने एकाच छताखाली उपलब्ध असतील. वर्षारंभीच्या होत असलेल्या फेस्टिव्हलसाठी सांगलीकरांमध्ये उत्सुकता वाढली आहे. नामांकित कंपन्यांसह स्थानिक कंपन्याही यात सहभागी होणार आहेत. खरेदीदारांसाठी पर्वणी ठरणारं हे शॉपिंग फेस्टिव्हल व्यापाऱ्यांसाठी उत्कृष्ट व्यासपीठ बनलेय. त्यामुळेच दर्जेदार उत्पादनांची मालिका इथे उपलब्ध  केली जाते. दुचाकी व चार चाकी वाहने, ग्राहकोपयोगी, विद्युत उपकरणे, फॅन्सी ड्रेसेस...अशी सांगलीकरांना आवडणारी खरेदीची लयलूट इथं करता येणार आहे. ऑटो व शॉपिंगचा धमाका एकाच छताखाली उपलब्ध होईल.

मोफत प्रवेश; ऑनलाइन शॉपिंग  
शॉपिंग फेस्टिव्हलमध्ये ग्राहकांना मोफत प्रवेश दिला जाणार आहे. तसेच विविध कंपन्यांपासून खास फेस्टिव्हल ऑफरही देण्यात येणार आहे. ऑनलाइन खरेदीचीही व्यवस्था फेस्टिव्हलमध्ये करण्यात आली आहे. सांगलीकरांनी खरेदीचा आनंद लुटावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: sakal shopping festival