कॅशलेस सुविधेसह ऑफर्सचा खजिना खुला

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 डिसेंबर 2016

कोल्हापूर - महिनाभर उत्सुकता लागून राहिलेल्या ‘सकाळ’च्या शॉपिंग फेस्टिव्हलला आजपासून दिमाखदार प्रारंभ झाला. ‘कुटुंबासाठी सर्व काही’ असे स्वरूप असलेल्या प्रदर्शनाच्या निमित्ताने सासने मैदानावर सलग पाच दिवस खरेदीची आनंदयात्रा अनुभवायला मिळणार आहे. सध्याच्या नोटाबंदीच्या पार्श्‍वभूमीवर सर्व स्टॉलवर कॅशलेस सुविधा उपलब्ध केली असून, पहिल्याच दिवशी हाउसफुल्ल गर्दीच्या साक्षीनेच खरेदीची पर्वणी कोल्हापूरकरांनी साधली. 

कोल्हापूर - महिनाभर उत्सुकता लागून राहिलेल्या ‘सकाळ’च्या शॉपिंग फेस्टिव्हलला आजपासून दिमाखदार प्रारंभ झाला. ‘कुटुंबासाठी सर्व काही’ असे स्वरूप असलेल्या प्रदर्शनाच्या निमित्ताने सासने मैदानावर सलग पाच दिवस खरेदीची आनंदयात्रा अनुभवायला मिळणार आहे. सध्याच्या नोटाबंदीच्या पार्श्‍वभूमीवर सर्व स्टॉलवर कॅशलेस सुविधा उपलब्ध केली असून, पहिल्याच दिवशी हाउसफुल्ल गर्दीच्या साक्षीनेच खरेदीची पर्वणी कोल्हापूरकरांनी साधली. 

दरम्यान, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्‌घाटन झाले. सकाळ माध्यम समूहाचे मुख्य संपादक श्रीराम पवार, कार्यकारी संपादक मनोज साळुंखे, हायटेक फर्निचरचे संचालक अभिजित घळसासी, पृथ्वीराज चव्हाण आदींची या वेळी प्रमुख उपस्थिती होती. फर्निचर क्षेत्रातील प्रसिद्ध ‘हायटेक फर्निचर’ प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक आहेत. 

प्रदर्शनात ऐंशीहून अधिक स्टॉल्सचा समावेश आहे. स्टॉल्सची नेटकी मांडणी आणि प्रदर्शनाला होणाऱ्या मोठ्या गर्दीच्या पार्श्‍वभूमीवर नेटकी आणि प्रशस्त पार्किंग व्यवस्थाही येथे केली आहे. कुटुंबातील प्रत्येक घटकाच्या बदलत्या गरजांचा आवर्जून विचार करूनच प्रदर्शनाचे आयोजन झाले आहे.

साहजिकच इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तू, गॅस शेगडी, सोलर सिस्टिम, आयुर्वेदिक हेल्थकेअर प्रॉडक्‍ट, विविध प्रकारचे गृहोपयोगी साहित्य आणि फॅन्सी ड्रेसपासून ते सहलींच्या मार्गदर्शनापर्यंतचा खजिनाच यानिमित्ताने खुला झाला आहे. विविध उत्पादनांचे स्टॉल्स येथे जसे आहेत, तशीच घरच्या घरी लघुउद्योग करता येईल, अशी विविध मशिन्सही येथे आहेत. साहजिकच बजेट कितीही असो, खरेदीसाठी प्रदर्शनामुळे अनेक पर्याय एकाच छताखाली उपलब्ध आहेत. विविध कंपन्यांनी खरेदीवर ऑफर्सही जाहीर केल्या आहेत. साहजिकच ऑफर्सचा धमाकाही यानिमित्ताने सुरू झाला आहे. खरेदीच्या आनंदोत्सवात भर घालणारी खाद्यसंस्कृतीदेखील स्टॉलच्या माध्यमातून उभी राहिली आहे. चला, तर मग सासने मैदानावर. मनपसंत खरेदी करू या... त्यासह विविध ऑफर्सचा खजिनाही लुटू या!

सर्वांसाठी सर्व काही...!
टीव्ही, टेपरेकॉर्डर, मोबाइल, मोबाइल ॲक्‍सेसरीज, एमपी थ्री, डीव्हीडी प्लेअर्स, फ्रीज, मायक्रोवेव्ह, टू व्हीलर, फोर व्हीलर, किचन ट्रॉली, क्रॉकरी, कॉस्मेटिक्‍स, कर्टन्स, फर्निशिंग, इम्पोर्टेड शूज, आटा-चक्की, मसाले, सोलर्स, शूज रॅक, कपडे, ज्वेलरी, किचन चिमणीज, गॅस शेगडी, आयुर्वेदिक प्रॉडक्‍टस्‌, फर्निचर, मातीची भांडी, सीसीटीव्ही कॅमेरे, वॉटर प्युरिफायर, मिल्क प्रॉडक्‍टस्‌, लेडीज ॲक्‍सेसरीज, पेस्ट कंट्रोल, बुक्‍स, झुला, वेडिंग मॅनेजमेंट अशा विविध स्टॉलसह खवय्यांसाठी पर्वणी ठरणारी खाद्यसंस्कृती, ॲम्युझमेंट पार्क येथे अवतले आहे. 

‘हायटेक’च्या आकर्षक ऑफर 
नागाळा पार्क कमानीजवळ नवरंग रिजन्सी येथे हायटेक फर्निचरचे तीन हजार चौरस फुटांचे प्रशस्त शोरूम आहे. प्रदर्शनात हायटेक फर्निचरचे सर्व प्रकारचे फर्निचर उपलब्ध केले आहे. माफक दरात अत्युच्च दर्जाचे इम्पोर्टेड वूड बेस्ड बोर्ड, दर्जेदार हार्डवेअर, मजबूत फिटिंग्ज वापरून अत्याधुनिक मशिन्सवर बनविण्यात येते. अत्याधुनिक टेक्‍श्चर, नवीन कलर्स, डिझाइनचे विविध प्रकारचे बेड, वॉर्ड रोब्ज, टीव्ही, एलसीडी युनिट, शोकेस, दिवाण कम बेड, सोफा आदी घरगुती व व्यावसायिक फर्निचर येथे उपलब्ध आहे.

आर्किटेक्‍टस्‌च्या मागणी व गरजेनुसार कंपनीमेड फर्निचर बनवून देण्याची सोयही आहे. सर्व फर्निचर शंभर टक्के वाळवी प्रतिबंधक आहे. क्वायर, फोम व स्प्रिंग या प्रकारांत गाद्यांची असंख्य व्हरायटी येथे आहे. प्रदर्शनाच्या निमित्ताने हायटेक फर्निचरतर्फे ग्राहकांसाठी खास ऑफर जाहीर केल्या आहेत. 

खिशात पैसे नसले तरी चालेल...
तुमच्या खिशात पैसे नसले तरी चालेल. प्रत्येक स्टॉलवर पेटीएम सुविधा असून त्या माध्यमातून खरेदी केल्यानंतर एका बारकोडिंगद्वारे तुमच्या खात्यातून थेट संबंधित स्टॉलधारकांच्या खात्यावर पैसे जमा होतील. सोमवार (ता.१२) पर्यंत सकाळी दहा ते रात्री साडेआठ या वेळेत प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले असेल.

‘सकाळ’चे सर्वच उपक्रम विधायक असतात. शॉपिंग फेस्टिव्हलच्या निमित्ताने कोल्हापूरकरांना एकाच छताखाली सर्व प्रकारची खरेदी येथे करता येणार आहे. त्याशिवाय कॅशलेस सुविधाही येथे उपलब्ध असल्याने ग्राहकांची सोय झाली आहे.
- डॉ. कुणाल खेमणार, मुख्य कार्यकारी अधिकारी. 

कुठेही उपलब्ध नसणाऱ्या फर्निचरच्या शेड्‌स हे ‘हायटेक’चे वैशिष्ट्य. ड्युरोफ्लेक्‍स कंपनीचे कोल्हापुरातील हे एकमेव एक्‍सक्‍लुझिव्ह स्टोअर आहे. ‘ड्युरोफ्लेक्‍स’ ही भारतातील मॅट्रेसेस क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी असून गाद्या-उशांची चार हजारांपासून ते ९० हजारांपर्यंतची रेंज प्रदर्शनात उपलब्ध आहे.
- अभिजित घळसासी, संचालक, हायटेक फर्निचर.

नागाळा पार्क कमानीजवळ नवरंग रिजन्सी येथे हायटेक फर्निचरचे तीन हजार चौरस फुटांचे प्रशस्त शोरूम आहे. प्रदर्शनात हायटेक फर्निचरचे सर्व प्रकारचे फर्निचर उपलब्ध केले आहे. प्रदर्शनाच्या निमित्ताने हायटेक फर्निचरतर्फे ग्राहकांसाठी खास ऑफर जाहीर केल्या आहेत. 
- पृथ्वीराज चव्हाण, संचालक, हायटेक फर्निचर.

Web Title: sakal shopping festival kolhapur