‘सकाळ शॉपिंग फेस्टिव्हल’च्या स्टॉल बुकिंगला प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 जानेवारी 2017

सांगली - नवीन वर्षाच्या प्रारंभीच ‘सकाळ’ने सांगलीकरांसाठी खरेदीचा महाउत्सव आयोजित केला आहे. विलिंग्डन महाविद्यालय मैदानावर १९ ते २३ जानेवारीअखेर होणाऱ्या शॉपिंग फेस्टिव्हलमध्ये नामवंत कंपन्यांची ब्रॅंडेड उत्पादने एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत. फेस्टिव्हलसाठी नामांकित कंपन्यांचा स्टॉल बुकिंगला जोरदार प्रतिसाद मिळाला आहे.

दोन वर्षांत ‘सकाळ’ चे शॉपिंग फेस्टिव्हल सांगलीकरांना खरेदीची पर्वणी ठरतो आहे. ‘सकाळ’ने व्यापाऱ्यांसाठी या शॉपिंग फेस्टिव्हलच्या निमित्ताने व्यासपीठ निर्माण करून दिले. त्याला मोठा प्रतिसाद मिळत असल्याने  व्यापाऱ्यांसाठी हे फेस्टिव्हल उत्कृष्ट व्यवसाय केंद्र  बनले. नेहमीप्रमाणचे फेस्टिव्हल अनेक वैशिष्ट्यांनी परिपूर्ण आहे. ग्राहकांना उत्सुकता आहे. विशेष म्हणजे फेस्टिव्हलमध्ये गृहोपयोगी वस्तूंचा नाही. प्रॉपर्टी, ऑटोमोबाईल विभागांचाही समावेश आहे. या फेस्टिव्हलमध्ये ग्राहकोपयोगी, घरगुती वापराची अनेक उपकरणे, कपडे, मोटार सायकलीपर्यंतच्या खरेदीची लयलूट करता येणार आहे. घरगुती वापराच्या वस्तू एकाच छताखाली पाहण्यास व खरेदीसाठी उपलब्ध आहेत. 

मुंबई, पुणे, दिल्ली, कोल्हापूरसह अनेक ठिकाणच्या कंपन्यांनी बुकिंग केले आहे. स्टॉल बुकिंगला सांगली, कोल्हापूर, सातारा परिसरांतून प्रतिसाद मिळत आहे. फेस्टिव्हलमधील दालनांसाठी आताच बुकिंग करा आणि आपली निराशा टाळा. 

स्टॉल बुकिंगसाठी 
बाळासाहेब नागरगोजे - (९८५०५५६००९)
राहुल कुलकर्णी - (९८२२५३३४५५)
परितोष भस्मे - (९७६६२१३००३)

Web Title: sakal shopping festival stall booking