"सकाळ'तर्फे 8 डिसेंबरपासून शॉपिंग फेस्टिव्हलला प्रारंभ 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 नोव्हेंबर 2016

कोल्हापूर - बदलती लाइफ स्टाइल, बदलत्या आवडी-निवडी म्हटलं, की ग्राहकांना हवे असते नवे काही. मग सुरू होते शोधाशोध आणि खरेदीसाठी पायपीट. मात्र नवनव्या स्टाइलकरिता एकाच छताखाली खरेदी करता आली तर...? ही संधी सकाळ माध्यम समूहातर्फे ग्राहकांना 8 डिसेंबरपासून "शॉपिंग फेस्टिव्हल'अंतर्गत उपलब्ध होत आहे. सासने मैदानावर 12 डिसेंबरपर्यंत चोखंदळ ग्राहकांसाठी ही पर्वणीच असेल. हायटेक फर्निचर हे फेस्टिव्हलचे मुख्य प्रायोजक आहेत. 

कोल्हापूर हे वैविध्यपूर्ण शहर आहे. जुन्या व नव्या परंपरांचा संगम येथे पाहायला मिळतो. आधुनिक स्टाइलची क्रेझ करण्यात तरुणाई नेहमीच आग्रही असते. त्यांची ही हौस भागविण्यासाठी नाताळचे औचित्य साधून शॉपिंग फेस्टिव्हलमध्ये वैविध्यपूर्ण नजराणा सासने मैदानावर अवतरणार आहे. टीव्ही, टेपरेकॉर्डर, मोबाइल, मोबाइल ऍक्‍सेसरीज, एमपी थ्री - डीव्हीडी प्लेअर्स, फ्रीज, मायक्रोवेव्ह, टू व्हीलर, फोर व्हीलर, किचन ट्रॉली, क्रॉकरी, कॉस्मेटिक्‍स, कर्टन्स, फर्निशिंग, इम्पोर्टेड शूज, आटा-चक्की, मसाले, सोलर्स, शूज रॅक, कपडे, ज्वेलरी, किचन चिमणीज, गॅस शेगडी, आयुर्वेदिक प्रॉडक्‍टस्‌, फर्निचर, मातीची भांडी, सीसीटीव्ही कॅमेरे, वॉटर प्युरिफायर, मिल्क प्रॉडक्‍टस्‌, लेडीज ऍक्‍सेसरीज, पेस्ट कंट्रोल, बुक्‍स, झुला, फूड अँड फन पार्क यांचा फेस्टिव्हलमध्ये समावेश असेल. 

त्याचबरोबर हायटेक फर्निचरमध्ये सर्व रेंजचे फर्निचर उपलब्ध असणार आहे. हायटेक फर्निचरतर्फे बनविण्यात येणारे अत्युच्च दर्जाचे इम्पोर्टेड वूड बेस्ड बोर्ड, दर्जेदार हार्डवेअर, मजबूत फिटिंग्ज वापरून अत्याधुनिक मशिन्सवर बनविण्यात येते. अत्याधुनिक टेक्‍श्चर, नवीन कलर्स, डिझाईनचे विविध प्रकारचे बेड, वॉर्डरोब्ज, टीव्ही, एलसीडी युनिट, शोकेस, दिवाण कम बेड, सोफा, डायनिंग सेटस्‌ आदी घरगुती व व्यावसायिक फर्निचरची सर्व रेंज उपलब्ध आहे. मागणी व गरजेनुसार कंपनीमेड फर्निचर बनवून देण्याची सोयही आहे. सर्व फर्निचर शंभर टक्के वाळवी प्रतिबंधक आहे. 

हायटेक फर्निचरचे नागाळा पार्क कमानीजवळ नवरंग रिजन्सी येथे तीन हजार चौरस फुटांचे प्रशस्त शोरूम सुरू केले असून येथे ड्युरोफ्लेक्‍स कंपनीचे कोल्हापुरातील एकमेव एक्‍सक्‍लुझिव्ह स्टोअर आहे. हायटेकचा स्टॉल फेस्टिव्हलमध्ये ग्राहकांसाठी पर्वणीच असणार आहे. 

फेस्टिव्हलमध्ये ज्यांना स्टॉल मांडायचे आहेत, त्यांनी बुकिंगकरिता सीनियर एक्‍झिक्‍युटिव्ह सूरज जमादार (9922551918) व संतोष पाटील (9975513951) यांच्याशी संपर्क साधावा.

Web Title: sakal shopping festival start from 8dec

टॅग्स