नगरमध्ये 18 ते 21 डिसेंबर अक्षर करंडक एकांकिका स्पर्धा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 डिसेंबर 2018

नगर  - सकाळ सोशल फाउंडेशन व अक्षर विचार प्रतिष्ठानातर्फे 18 ते 21 डिसेंबरदरम्यान नगरच्या माउली सभागृहात राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचे हे सातवे वर्ष असून, प्रथम नोंदणी करणाऱ्या 51 संघांना स्पर्धेत प्राधान्य दिले जाणार आहे. 

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

"अक्षर'चे अध्यक्ष बलभीम पठारे यांनी ही माहिती दिली. नाट्यकलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, तसेच युवा पिढीमध्ये कलासंस्कृती रुजविण्याच्या उद्देशाने दर वर्षी ही स्पर्धा घेतली जाते. हौशी नाट्य संस्था व महाविद्यालयीन संघांसाठी स्पर्धा खुली असून, त्यात फक्त मराठी एकांकिका सादर करता येतील. पहिल्या तीन विजेत्या संघासाठी 25 हजार, 20 हजार, 15 हजार अशी बक्षिसे असून, दोन संघांना प्रत्येकी पाच हजारांची उत्तेजनार्थ बक्षिसे मिळतील. याशिवाय अभिनय, गुणवत्ता, प्रकाशयोजना, लेखन, रंगभूषा, वेशभूषा, नेपथ्य, संगीत, सर्वोत्कृष्ट लेखन यासाठीही स्वतंत्र बक्षिसे देण्यात येतील. संपर्क - 7774019001 व 9420470001. 

Web Title: sakal social foundation