‘सकाळ’च्या जलसंधारण कामास बळ द्या - दादासाहेब कांबळे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 मे 2018

कातरखटाव - दुष्काळी परिस्थितीत महिलांच्या डोक्‍यावर दिसणारा हंडा हद्दपार करण्यासाठी ‘सकाळ’च्या माध्यमातून सुरू असलेल्या जलसंधारणाच्या उपक्रमांना लोकसहभागाचे बळ देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी केले.   

मानेवाडी (ता. खटाव) येथे तनिष्का गटाच्या माध्यमातून व सकाळ रिलीफ फंडातून बंधाऱ्यातील गाळ व ओढ्याच्या रुंदीकरण कामाच्या प्रारंभप्रसंगी ते बोलत होते. मानेवाडीचे सरपंच राजेंद्र माने, तलाठी प्रल्हाद माने, कृषी सहायक राऊत, राजेश माने,‘सकाळ’चे मुख्य उपसंपादक संजय शिंदे, तनिष्का व्यवस्थापक लक्ष्मण चव्हाण, बातमीदार रूपेश कदम उपस्थित होते. 

श्री. कांबळे म्हणाले,‘‘गावामधील जलसंधारणाच्या कामावर महिलांनी लक्ष ठेवल्यास काम उत्कृष्ट प्रकारे होईल. जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून गावात विविध कामे करण्यात येतील. त्या कामांसाठी लोकसहभाग द्यावा.’’ 
श्री. शिंदे यांनी ‘सकाळ’च्या विविध उपक्रमांची माहिती दिली. श्री. कदम यांनी खोलीकरण व रुंदीकरण कशा प्रकारे करावे, याची माहिती दिली. 

या वेळी तनिष्का रुक्‍मिणी माने, अलका माने, संजीवनी माने, मंदाकिनी माने, नीलिमा माने, मीराबाई माने, पारुबाई देवकर आदी तनिष्का उपस्थित होत्या. अनिल माने यांनी प्रास्ताविक केले. राजेश माने यांनी आभार मानले.

Web Title: sakal Water conservation work dadasaheb kamble