निर्माल्य संकलनासोबतच 'सकाळ यिन' करणार स्मार्ट सिटीचा जागर! 

Sakal Yin arranged Nirmalya compilation at Solapur
Sakal Yin arranged Nirmalya compilation at Solapur

सोलापूर : गणेश विसर्जनाच्या दिवशी सकाळ यिन सदस्य विविध ठिकाणी निर्माल्य संकलन करणार आहेत. या उपक्रमाचे पाचवे वर्ष असून यंदा निर्माल्य संकलनासोबतच स्मार्ट सिटीचा जागरही करण्यात येणार आहे. 

शहरातील संभाजी तलाव आणि सिद्धेश्वर तलाव या ठिकाणी निर्माल्य संकलन करण्यात येईल. यासाठी महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सहकार्य लाभणार आहे. गणेशमूर्तीसोबत तलावात निर्माल्य जाऊ नये यासाठी प्रबोधन करण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या तयारीसाठी 'सकाळ' कार्यालयात बैठक घेण्यात आली. यावेळी सोलापूर विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे प्रमुख प्रा. मंगलमूर्ती धोकटे, प्रा. डॉ. वीरभद्र दंडे, प्रा. विजय रेवजे, विशेष शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक एन. एस. आयलाने, महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाचे मुख्य सफाई निरीक्षक संजय जोगदनकर, यिन सदस्य निशा भोसले, योगेश सुरवसे, राहुल बिराजदार, सिद्धाराम कोरे, अमोल बोदांर्डे आदी उपस्थित होते. 

निर्माल्य संकलन उपक्रमात सहभाग -
सकाळ यिनच्या निर्माल्य संकलन उपक्रमात एन बी नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, एन के ऑर्किड इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अॅड टेक्‍नॉलॉजी, दयानंद महाविद्यालय, वसुंधरा महाविद्यालय, लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय, हिराचंद नेमचंद वाणिज्य महाविद्यालय, वालचंद महाविद्यालय, युथ फॉर डेव्हलपमेंट आणि राष्ट्रीय सेवा योजना विभाग सोलापूर विद्यापीठाचे विद्यार्थी सहभागी होणार आहेत. 
 
राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत सुद्धा स्वच्छता आणि आरोग्यासंदर्भात विविध उपक्रम राबवले जातात. पर्यावरण जागृतीसाठी सकाळ यिनचा हा स्तुत्य आहे. राष्ट्रीय सेवा योजनेचे बहुसंख्य स्वयंसेवक निर्माल्य संकलनात उस्फूर्त सहभाग नोंदवतील. 
- प्रा. मंगलमूर्ती धोकटे, राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख, सोलापूर विद्यापीठ 

सकाळ सोलापूरला स्मार्ट सिटी करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. किल्ला स्वच्छता, संभाजी तलाव स्वच्छता आदी उपक्रमातून चांगली जनजागृती होत आहे. यात सोलापूरकरांचे सहकार्य आवश्‍यक आहे. गणेश विसर्जनाच्या दिवशी सकाळ यिनच्या उपक्रमाला आमचे सर्वतोपरी सहकार्य असेल. 
- संजय जोगदनकर, मुख्य सफाई अधीक्षक, सोलापूर महापालिका


Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com