सलाम पोलीस : अखेर माऊलीला मिळाला निवारा... 

 Salaam Police: A mother finally got shelter ...
Salaam Police: A mother finally got shelter ...

शिराळा (जि. सांगली) : पतीने सोडले. लॉकडाऊनमुळे हातचे काम गेले. त्यामुळे ती चार दिवस तीन चिमुकल्यासह चिंचेच्या झाडाखाली आसऱ्याला आली. हे पोलिसांना समजताच त्यांनी आधार देऊन तिची राहायची सोय केली. तिथून तिला हाकलून देण्याचा प्रयत्न झाला. पोलिसांनी दम देताच तीचा निवारा नक्की झाला. ही कहाणी आहे शिराळा तालुक्‍यातील टाकावे येथील रुपाली दादासो कराळे हिची. 

पती तिचा सांभाळत करीत नसल्याने ती एके ठिकाणी काम करत होती. त्याच परिसरात राहत असे. लॉकडाऊनमुळे काम थांबले. खायचे काय आणि रहायचे कुठे ? असा प्रश्‍न तयार झाला. ती नाथ मंदिर परिसरात चिंचेच्या झाडाखाली पार्थ (वय 12), विनायक (वय 10) व रेणुका (वय 7)  यांच्यासह राहिली.

मंदिरातून जेवण दिले जात असे. तिथल्या लोकांनी शिराळा पोलीस ठाण्याचे सहा पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांना माहिती दिली. त्यांनी उपनिरीक्षक सुप्रिया दुरंदे, हवालदार अभिजित पवार यांना तिथे पाठवले. पूरेसे अन्न नसल्याने ती थकली होती. अंगात त्राण नव्हते. त्यांनी दोन किट देऊन बिऊर येथे आईकडे पाठवले. आईही झोपडीत राहत असल्याने चौघांना राहण्याएवढी जागा नाही. 

त्यामुळे बिऊरमध्ये खोली भाड्याने घेतली. "कोरोना'च्या भीतीने लोकांनी घराबाहेर काढले. घर मालकावर दबाव आणला. त्यावेळी ती तीन मुलांना घेऊन रस्त्यावर आली. सहायक पोलिस निरीक्षक विशाल पाटील यांना माहिती समजली. त्यांनी कर्मचाऱ्यांना पाठवून बाजूच्या लोकांना खडसावून तिला पुन्हा त्या खोलीत प्रवेश मिळवून दिला. या पुढे तिला त्रास होणार नाही अशी हमी घेतली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com