संतुलित आहारासाठी 'यांची' तीन वर्षांपासून सलाड पार्टी

 संतुलित आहारासाठी 'यांची' तीन वर्षांपासून सलाड पार्टी

कोल्हापूर - संतुलित आहार आरोग्यास लाभदायक ठरतो. या विचारांचा प्रत्यक्ष उपयोग करून चांगले आरोग्य राखण्यासाठी प्रत्येक शनिवारी सलाड पार्टीचे आयोजन कुशिरे पोहाळे येथील शिक्षक व तरुण करतात. आठवड्यातून एक दिवस पूर्ण नैसर्गिक आहार घेण्याचा निर्धार ग्रुपने केला आहे.

तीन वर्षांपासून उपक्रम सुरू आहे. नुकताच ग्रुपचा तिसरा वर्धापन दिन झाला. यावेळी सांगलीचे ज्येष्ठ इतिहास अभ्यासक सदानंद कदम, माजी शिक्षण सहायक शिक्षण संचालक संपत गायकवाड, डॉ. श्रीकांत पाटील, चंद्रकांत निकाडे, प्रकाश पाटील, प्रभंजन चौगुले, गजानन गुरव  उपस्थित होते. प्रत्येकाच्या घरीच कुटुंबीयांसमवेत पार्टीचे आयोजन केले जाते. यात चंद्रकांत निकाडे, भिवाजी काटकर, संजय कळके, प्रकाश ठाणेकर, सुरेश लोहार, रंगराव पाटील, नंदकुमार चौगले, बाबासाहेब गुरव, कृष्णात चौगले, पांडुरंग पाटील, कृष्णात पाटील, परसू पाटील, प्रकाश चौगले, विलास बोरचाटे, अमर पाटील, उदय निकाडे, विजय एकशिंगे, आकांक्षा ठाणेकर यांचा समावेश आहे.

१५-२० लोकांच्या सलाड पार्टीसाठी सातशे ते हजार रुपये इतका खर्च येतो. साधारणपणे तीन महिन्यांनंतर एका ग्रुप मेंबरवर या सलाड पार्टीचा नंबर येतो. पार्टीमध्ये सुरवातीला वेलकम ड्रिंक म्हणून चहा, कॉपी, दूध किंवा थंड पेय न देता आंबील, नाचण्याची खिर किंवा माडगे दिले जाते. सामुदायिकरित्या पालेभाज्या स्वच्छ निवडून मिठाच्या पाण्याने धुऊन खाण्यायोग्य तुकडे बनविले जातात. यामध्ये मेथी, पोकळा, कोथिंबीर, कोबी, फ्लाॅवर, पुदिना, पालक या पालेभाज्या तसेच काकडी, टोमॅटो, बोर, वाटाणा या फळभाज्या, कांदा, गाजर, मुळा, बीट हे कंद तसेच केळी, द्राक्षे, सीताफळे, पेरु, सफरचंद, फणस, पपई, कलिंगड, संत्री, डाळींब, मोसंबी, अननस, यासारखी ज्या त्या मोसमात उपलब्ध असणारी फळे समाविष्ठ केली जातात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com