मोहोळचे उत्पादक करणार खरबुजांची दिल्लीच्या बाजारात विक्री

राजकुमार शहा 
सोमवार, 2 एप्रिल 2018

मोठे उत्पादन असल्याने दिल्ली मुंबई येथील व्यापारी थेट पापरीच्या शेतकऱ्यांच्या संपर्कात असतात.

मोहोळ - पापरी ता. मोहोळ येथील खरबुज केळी उत्पादकांना आता नव्या बाजारपेठेचे वेध लागले असून तेरा लाख रुपयाचे खरबुज दिल्लीच्या बाजारात केवळ मोबाईलच्या माध्यमातून विक्री करण्याची किमया येथील शेतकरी समाधान अभिमन्यु भोसले यांनी केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ अर्थार्जन होत आहे. पिकविण्यापेक्षा विकायला शिका हा त्यांचा संदेश शेतकऱ्यांना उपयोगी पडत आहे.  

बोर, डाळींब, खरबुज, काकडी, टोमॅटो, कलींगड उत्पादनात पापरी जिल्हयात वरच्या क्रमांकावर आहे. पिकविलेला माल जवळच्या बाजारपेठेत जाईल. त्या दरात विकण्याची पद्धत आता इतिहास जमा होत आहे. मोठे उत्पादन असल्याने दिल्ली मुंबई येथील व्यापारी थेट पापरीच्या शेतकऱ्यांच्या संपर्कात असतात. या संदर्भात अधिक माहिती देताना शेतकरी समाधान भोसले म्हणाले, माल पिकविण्यापेक्षा विकायच कसब मोठे आहे एकाच बाजार पेठेत माल विकण्यापेक्षा नवनवीन बाजार पेठ शोधली पाहीजे. बाजारपेठेत कशाला मागणी आहे. तेच पिकविले पाहिजे शेती ही व्यापारी पद्धतीने केली पाहीजे. तरच शेतकरी व शेती टिकणार आहे केवळ विकण्याचे ज्ञान नसल्याने व्यापारी मोठे होऊ लागले आहेत. 

अशी होती मालाची विक्री - 

  • प्रथम व्यापाऱ्याशी मोबाईलवर दराबाबत होते चर्चा. 
  • त्याला लागणाऱ्या साईजचा अंदाज घेतला जातो. 
  • उत्पादित खरबुजाचे फोटो काढुन मोबाईलवर पाठविले जातात नंतर दर ठरविला जातो. 
  • खरबुजाची प्रतवारी करून ते बॉक्स मध्ये पॅकींग केले जाते.
  • बाजारात विकल्यावर तसा संदेश संबंधित शेतकऱ्यांच्या मोबाईल वर पाठविला जातो. 
  • सहा एकरात मोबाईलच्या माध्यमातून तेरा लाखाचे खरबुज विकल्याचे भोसले यांनी सांगितले.
Web Title: The sale of Cantaloupe can be sold in the Delhi market