जिल्ह्यात दारूची विक्री ‘चोरी चोरी, चुपके चुपके’

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 मे 2017

सांगली - सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे राज्य व राष्ट्रीय महामार्गावरील दारू विक्री बंद झाली आहे. मात्र त्याचाच फायदा घेऊन आता अवैध दारू विक्रीचा व्यवसाय फोफावला आहे. एकीकडे जिल्ह्यातील ८० टक्के बार कागदोपत्री बंद असले तरी, ‘चोरी चोरी, चुपके चुपके’ दारू विक्रीचे सारे व्यवहार सुरू आहेत. राज्य उत्पादन शुल्क  विभागाचे हात ओले असल्याने अवैध दारू विक्रेत्यांविरुद्ध कठोर कारवाई करता येत नाही. या साऱ्यामुळे आता बनावट दारू तयार करणाऱ्या टोळीला मात्र उधाण आले आहे. 

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने राज्य व राष्ट्रीय महामार्गावरील दारू दुकाने बंद झाले. त्यामुळे जिल्ह्यातील ८० टक्के दारू दुकाने, बीअर बार  व हॉटेल्स बंद झाली. ज्या ठिकाणी दारू विक्रीला परवानगी आहे, तेथे पाय ठेवायला जागा नाही, अशी अवस्था  झाली आहे. बार चालकांच्या संघटनेकडून रस्ते हस्तांतरणासाठी पाठपुरावाही केला जात आहे. पण,  गेल्या काही दिवसांपासून सर्वच बारला दारू विक्री जोमात सुरू झाली आहे. कोल्हापूर रस्त्यावरील बहुतांश हॉटेल चालकांनी टेरेसवर किंवा बंदिस्त खोलीत दारूड्यांची व्यवस्था केली आहे. दुसऱ्या बाजूला  गावठी, अवैध दारू विक्री जोरात सुरू असल्याचे चित्र आहे. बनावटगिरीलाही उधाण आले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून ठिकठिकाणी धाडी टाकल्याचे सांगितले जाते, मात्र तेवढ्यापुरतेच बंदचे नाटक झाले  की पुन्हा हा चोरी छुपे व्यवसाय सुरू होतो. प्रत्येक हॉटेल चालकाकडून मलई गोळा करूनही दुर्लक्ष केले जात आहे. 

अवैध दारू विक्रीचा ‘उदय’ 
सांगली शहरातील ८० टक्के बार निर्णयामुळे बंद झाले. पण सद्य परिस्थितीत सर्वच ठिकाणी खुलेआम विक्री केली जात आहे. कोल्हापूर रस्त्यावर याचा ‘उदय’ झाला असून तेथून साऱ्यांनीच खुलेआम विक्री सुरू केली आहे. सांगली-मिरज रस्त्यावरील काही हॉटेलमध्येही विक्री केली जात आहे. यावर नियंत्रण ठेवणार कसे?

Web Title: Sale of liquor in the sangli district