सांगली जिल्हा परिषद : 502 पदांची लवकरच भरती  

ZP_Sangli
ZP_Sangli

सांगली : जिल्हा परिषदेकडे शिक्षक वगळता अन्य कर्मचाऱ्यांच्या रिक्तपदांची संख्या 502 आहे. सरळसेवा भरतीने लवकरच पदे भरली जाणार आहेत. जिल्हा परिषदेने शासनाला ही माहिती सादर केली आहे.

सांगलीसह अनेक ठिकाणी पेपरफुटीची प्रकरणे घडल्यामुळे राज्यस्तरावरून लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. सरळसेवा भरतीसाठी शंभर टक्के रिक्तपदांची माहिती जिल्हा परिषदेकडून नुकतीच मागवली आहे. शिक्षकांची 616 पदे वगळता वर्ग तीन कर्मचाऱ्यांची 502 पदे रिक्त असल्याबद्दल अहवाल सादर झाला. मंजूरपैकी 1118 पदे रिक्त आहेत. माहिती शासनाला सादर केल्यामुळे लवकरच पदे भरली जातील, अशी शक्‍यता आहे.

गतवर्षी वर्षअखेरीस पदे भरण्याबाबत हालचाली झाल्या. परंतू भरती प्रक्रिया निश्‍चित झाली नाही. रिक्तपदे भरली जावीत अशी मागणी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे इस्लामपूर दौऱ्यात केली. श्री. फडणवीस यांनी सकारात्मकता दर्शवली. कर्मचारी, अधिकाऱ्यांची पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त आहेत. सध्या कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांवर ताण आहे. आतापर्यंत जिल्हास्तरावरून भरती प्रक्रिया राबवली जात होती. सांगलीसह काही जिल्हा परिषदांत पेपरफुटीची प्रकरणे घडल्यामुळे लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर एकाचवेळी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. भरती पारदर्शक होऊ शकेल. निर्णयाचे स्वागतही होत आहे.

रिक्त पदे अशी   
सामान्य प्रशासन लिपीक -2,
वित्त विभाग कनिष्ठ सहाय्यक-5,
ग्रामपंचायत विभाग विस्तार अधिकारी-3,
कंत्राटी ग्रामसेवक-21,
आरोग्य विभाग औषध निर्माण अधिकारी 10,
आरोग्य सेवक (50 टक्के हंगामी फवारणी कर्मचाऱ्यांतू)- 159,
आरोग्य सेवक पुरूष (40 टक्के सरळसेवा)- 26,
आरोग्य सेवक महिला- 219,
कलाकार व छायाचित्रकार- 1,
जिल्हा महिला क्षेत्र कार्यकर्ता आणि संगणक-1,
प्रयोगशाळा तंत्रज्ञ- 2,
कृषि विभाग विस्तार अधिकारी-1,
बांधकाम विभाग कनिष्ठ अभियंता-6,
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक-21,
कनिष्ठ आरेखक- 2,
तारतंत्री- 1,
जोडारी-1,
पशुसंवर्धन विभाग पशुधन पर्यवेक्षक-1,
महिला विभाग पर्यवेक्षिका- 9,
ग्रामीण पाणीपुरवठा कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)-5,
कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)- 1,
आरेखक- 1,
शिक्षण विभाग विस्तार अधिकारी वर्ग तीन श्रेणी तीन-4
एकुण 502

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com