सलगरेत पकडला सहा फुटी नाग

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 एप्रिल 2018

सलगरे - सलगरेतील सर्पमित्रांनी घरात शिरलेल्या विषारी सहा फुटी नागाला पकडून एका कुटुंबाचे संरक्षण केले. अलीकडे सलगरे परिसरातही विषारी सापांची संख्या वाढल्याचे चित्र आहे.

सलगरे - सलगरेतील सर्पमित्रांनी घरात शिरलेल्या विषारी सहा फुटी नागाला पकडून एका कुटुंबाचे संरक्षण केले. अलीकडे सलगरे परिसरातही विषारी सापांची संख्या वाढल्याचे चित्र आहे.

सलगरे गावापासून दोन किलोमीटर अंतरावर जुन्या सलगरे ते रांजणी मार्गावर मळाभागात बबन पवार यांच्या घराजवळ रामदास शिंदे यांच्या राहत्या घरात रात्री आठ वाजण्याच्या सुमारास सहा फुटी नागाने प्रवेश केल्याचे बघितल्यानंतर रामदास शिंदे यांचे कुटुंबीय भयभीत  होऊन घराबाहेर पडले होते. यावेळी सलगरे गावातील सर्पमित्र संजय सुतार व विकास लोहार यांना फोन करून बोलवून घेतल्यानंतर या सर्पमित्रांनी बॅटरीच्या प्रकाशात शिंदे यांच्या घरात खाटाखाली लपलेल्या सहा फुटी नागाला पकडण्यात आल्याने या नागाला पाहून भयभीत झालेल्या रामदास शिंदे यांच्या कुटुंबांची सुटका केली व पकडलेल्या सहा फुटी नागालाही जीवदान देऊन सलगरेतील वनीकरणामध्ये सोडून देण्यात आले.

सलगरेतील सर्पमित्र संजय सुतार यांनी सांगितले की, सलगरे परिसरात वर्षाला मण्यार, घोणस, फुरसे, नाग या विषारी सापांसह धामण, गवत्या, मांडुळ, कवड्या, तस्कर आदी जातीचे अर्धविषारी व बिनविषारी २५०० ते ३००० साप पकडले जातात व ते वनीकरणात सोडले जातात. सलगरे परिसरातील वातावरणातील बदलामुळे नदीकाठावर आढळणाऱ्या विषारी, बिनविषारी सापांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. सध्या या परिसरात दुर्मिळ असणाऱ्या विषारी, बिनविषारी सापांच्या जाती मोठ्या प्रमाणात आढळून येत असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: salgare sangli news snake