गर्व आहे नाभिक व्यावसायिक असल्याचा !

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 7 एप्रिल 2019

एक नजर

  • राजारामपुरीतील सलून व्यावसायिक रामचंद्र संकपाळ यांची सुवर्ण कात्री ग्राहकांच्या सेवेत रुजू
  • नऊ इंच लांब आणि दहा तोळ्यांची कात्री
  • प्रसिद्ध सराफ मदन कारेकर यांनी केली तयार. 

कोल्हापूर - राजारामपुरीतील सलून व्यावसायिक रामचंद्र संकपाळ यांची सुवर्ण कात्री ग्राहकांच्या सेवेत रुजू झाली. यानिमित्ताने राजारामपुरी बाराव्या गल्लीतील मिरर हेअर ब्युटी परिसरात नाभिक व्यावसायिकांचा स्नेहमेळावाच भरला. ‘गर्व आहे आम्ही नाभिक व्यावसायिक असल्याचा’ असा अभिमान आज साऱ्यांच्याच चेहऱ्यावर झळकला.

शासकीय किंवा कुठल्याही गलेलठ्ठ पगाराच्या नोकरीबरोबरच नाभिक व्यवसायही करिअरचा सर्वोत्तम मार्ग असल्याचा संदेश देण्यासाठी श्री. संकपाळ यांनी सुवर्ण कात्री तयार केली आहे. नऊ इंच लांब आणि दहा तोळ्यांची ही कात्री प्रसिद्ध सराफ मदन कारेकर यांनी तयार केली आहे. जावळ काढण्यासाठी कात्रीचा वापर करणार आहे. दुपारी बारा ते सायंकाळी पाच या वेळेत ही कात्री पाहण्यासाठी खुली ठेवणार असल्याचे श्री. संकपाळ यांनी सांगितले.

संबंधीत बातम्या - 

रामभाऊंची कात्री, दहा तोळे सोन्याची !

Web Title: Saloon Professional Ramchandra Sankapal comment