भाजपची ऑफर नाकारून शिराळ्याच्या विकासासाठी 'हे' लढणार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2019

शिराळा - गेल्या पंधरा दिवसात भाजपकडून महामंडळ व इतर पदाच्या ऑफर मला मिळाल्या होत्या. त्या नाकारून मी शिराळा मतदार संघाच्या विकासासाठी अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहे, असे प्रतिपादन सम्राट महाडिक यांनी केले.

शिराळा - गेल्या पंधरा दिवसात भाजपकडून महामंडळ व इतर पदाच्या ऑफर मला मिळाल्या होत्या. त्या नाकारून मी शिराळा मतदार संघाच्या विकासासाठी अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहे, असे प्रतिपादन सम्राट महाडिक यांनी केले.

शिराळा येथे अर्ज भरल्यानंतर आयोजित प्रचार सभेत श्री. महाडिक बोलत होते. ते म्हणाले, अनेक वर्षे वाकुर्डे योजनेचे फक्त गाजर दाखवून निवणुका जिंकल्या. मात्र या मतदार संघाचा विकास झाला नाही. त्यामुळे ही परिवर्तनाची लढाई जनतेने हाती घेतली आहे.

प्रारंभी शिराळा विधानसभा मतदार संघातून शक्ती प्रदर्शन करत अपक्ष म्हणून सम्राट महाडिक यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. महाडिक यांनी अंबामातेचे दर्शन घेतल्यानंतर मंदिरापासून फेरीला प्रारभ झाला. ही फेरी अंबामाता मंदिर, सोमवार पेठ, गुरुवार पेठ मार्गे शिराळा बस स्थानकापासून तहसील कार्यालयापर्यंत आली. तेथे या फेरीचे सभेत रूपांतर झाले. या फेरीत राहुल महाडिक, राजन महाडिक, मारुती खोत, सी. बी. पाटील, दि. बा. पाटील, जयसिंगराव शिंदे, केदार नलवडे, गिरीष पाटील, राम जाधव, विवेक शहा, मिनाक्षीताई महाडिक, हर्षदा महाडिक, तेजस्विनी महाडिक, विद्याताई पाटील यांनी सहभाग घेतला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Samarat Mahadik fill form from Shirala