Vidhan Sabha 2019 : उमेदवारीबाबत समरजितसिंह घाटगे असे म्हणाले,...

Vidhan Sabha 2019 : उमेदवारीबाबत समरजितसिंह घाटगे असे म्हणाले,...

कागल - भाजप व शिवसेनेच्या नेत्यांनी माझ्या उमेदवारीबाबत फेरविचार करावा. कागलची जागा भाजपला मिळावी. ते शक्‍य नसेल तर यापूर्वी चर्चा झालेप्रमाणे शिवसेनेचा एबी फॉर्म मला देऊन माझी उमेदवारी निश्चित करावी, अशी मागणी शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी पत्रकार परिषदेत केली. 

श्री. घाटगे म्हणाले, अन्यथा मला जनतेच्या एबी फॉर्मवर अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी लागेल. उमेदवारी डावलणे हा केवळ माझ्यावरच नव्हे तर मतदार संघातील कार्यकर्त्यांवर व जनतेवर अन्याय आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत तीन ऑक्‍टोबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणेचा निर्णय आम्ही घेतला आहे, असेही घाटगे यांनी स्पष्ट केले.

श्री घाटगे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या साक्षीने मी साडेतीन वर्षापूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला आणि राजकारणात व समाजकारणात सक्रीय झालो. नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुका पक्षाच्या कमळ चिन्हावर लढविल्या. विकासाचा अजेंडा घेऊन कागल विधानसभा मतदार संघात मी व माझी पत्नी नवोदिता घाटगे यांनी मतदार संघ पिंजून काढला. प्रलंबित कामाची माहिती घेऊन विकासकामाचा धडाका लावत शक्‍य तेवढी कामे पूर्ण केली. 

श्री. घाटगे म्हणाले, 2019 ची विधानसभा निवडणूक भाजपच्यावतीने मी लढवावी अशी कार्यकर्त्यांनी तसेच भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी इच्छा व्यक्त केली. त्यादृष्टीने मी रात्रंदिवस सक्रीय राहिलो. निवडणूक जवळ येईल तसे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मला मोठे पाठबळ दिले. भाजप शिवसेना युती झाल्यानंतर मला उमेदवारी देण्याचे नियोजनही झाले. युतीचा उमेदवार म्हणून मला उमेदवारी जाहीर करण्याची फक्त औपचारिकता बाकी होती. परंतु युतीच्या चर्चेत शिवसेनेच्या आग्रहास्तव कागलची जागा शिवसेनेला सोडण्यात आली. या जागेवर माझा हक्क असलेमुळे मी शिवसेनेच्या तिकिटावर ही निवडणूक लढवावी, असेही मुख्यमंत्री, पालकमंत्री व शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांच्या चर्चेअंती ठरले. 28 सप्टेंबर रोजी त्याची घोषणाही होणार होती. पण दिवसभरात काय घटना घडल्या याचे कोड मलाही पडले आहे. अनपेक्षितपणे शिवसेनेकडून कागलच्या जागेवर एबी फॉर्म देण्यात आला. या राजकीय प्रक्रीयेचा मी बळी ठरलो आहे असे मला वाटते. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com